कुख्यात कल्लू फरार राहून करत होता गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:46+5:302021-05-29T04:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अट्टल गुन्हेगार सुरेंद्र ऊर्फ कल्लू लीलाधर होले याच्या तहसील पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून सोन्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अट्टल गुन्हेगार सुरेंद्र ऊर्फ कल्लू लीलाधर होले याच्या तहसील पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून सोन्याचे दागिने तसेच दोन दुचाकी असा एकूण दीड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्लू होले हा कुख्यात गुन्हेगार असून, तो अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारीत सक्रिय आहे. अल्पवयीन असताना त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सहा वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. सध्या कल्लूचे वय १९ वर्षे असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची स्वतःची टोळी असून, ती चोरी, घरफोडीचे नेहमी गुन्हे करते. तहसील पोलिसाच्या पथकाने १६ मेच्या पहाटे कल्लूच्या तीन साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली होती. कल्लू मात्र पळून गेला होता. २५ मे रोजी कल्लूला तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली. त्याचा पोलीस कोठडी रिमांड मिळवून त्याच्याकडून सोन्याचे दागिने तसेच चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. कुख्यात कल्लूच्या टोळीत अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समजते.
---
अल्पवयीन असतानाच केली हत्या
कुख्यात कल्लूने अल्पवयीन असतानाच एकाची हत्या केली होती. त्याच्याविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल आहे.
---