गुन्हेगारी वैमनस्यातून झाली कुख्यात नस्सूची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:26+5:302021-07-03T04:07:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कुख्यात गुन्हेगार छोटा नस्सू ऊर्फ सनी विजयसिंग चव्हाण (वय १८) याची हत्या गुन्हेगारी वैमनस्यातूनच ...

The infamous Nassu murder was the result of a criminal feud | गुन्हेगारी वैमनस्यातून झाली कुख्यात नस्सूची हत्या

गुन्हेगारी वैमनस्यातून झाली कुख्यात नस्सूची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कुख्यात गुन्हेगार छोटा नस्सू ऊर्फ सनी विजयसिंग चव्हाण (वय १८) याची हत्या गुन्हेगारी वैमनस्यातूनच झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी चाैघांना अटक करून त्यांची ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.

एमआयडीसीतील राजीवनगरात राहणाऱ्या नस्सूची परिसरात प्रचंड दहशत होती. अल्पवयीन असतानाच तो गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. त्याने हत्या, हत्येचा प्रयत्न आणि अन्य असे एकूण ११ गंभीर गुन्हे केले होते. कारागृहात असतानाही त्याने एक गंभीर गुन्हा केला होता. आरोपी रियाज मोहम्मद महफिल शेख (वय २६), अजय काशिनाथ बिरगडे (वय २१) , रोहित श्रावण श्रीरामे (वय २१), संदीप बोपचे आणि पवन वैद्य यांच्यासोबत त्याचा वाद सुरू होता. हिंगणा-एमआयडीसी भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ते एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावरून एकमेकांच्या मित्रांवर हल्ले, धमक्या असे प्रकारही घडले होते. नस्सूपाहून धोका असल्याची भावना झाल्याने रियाजने काही दिवसांपूर्वी आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. तो संधी शोधत होता. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास राजीवनगरातील मेश्रामच्या गल्लीत नस्सू एकटा दिसताच आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या केली. या गुन्ह्यामुळे एमआयडीसीत प्रचंड थरार निर्माण झाला. नस्सूची आई शारदा विजयसिंग चव्हाण (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधी रियाज, अजय आणि श्रीरामे या तिघांना अटक केली, तर रात्री बोपचे तसेच वैद्यला पकडले. आधी अटक केलेल्या तिघांचा ६ जुलैपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.

-----

आरोपींना वाटत होता धोका

आरोपींना नस्सू नेहमी धमकावत होता. तो गेम करेल, अशी भीती आरोपींना वाटत होती. त्यामुळे त्यालाच संपवून टाकण्याचा कट आरोपींनी रचल्याचे प्राथमिक चाैकशीत पुढे आले आहे.

----

Web Title: The infamous Nassu murder was the result of a criminal feud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.