कुख्यात पंकज धोटेच्या मुसक्या बांधल्या

By admin | Published: July 14, 2017 02:38 AM2017-07-14T02:38:32+5:302017-07-14T02:38:32+5:30

गुन्हेगारी वैमनस्यातून प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणावर गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या कुख्यात पंकज धोटे याच्या मुसक्या बांधण्यात

The infamous Pankaj dhote's musk is built | कुख्यात पंकज धोटेच्या मुसक्या बांधल्या

कुख्यात पंकज धोटेच्या मुसक्या बांधल्या

Next

गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई : पिस्तूल अजून सापडलेच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारी वैमनस्यातून प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणावर गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या कुख्यात पंकज धोटे याच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले आहे. सावनेरजवळ अटक करून त्याला गुरुवारी सायंकाळी नागपुरात आणण्यात आले.
माजी नगरसेवक मामा धोटेंचा मुलगा असलेला पंकज गुन्हेगारी जगतात आपला दबदबा निर्माण करू पाहत आहे. गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड सुमित ठाकूर याच्याशी पंकजचे वैर आहे. विविध वादग्रस्त प्रकरणातील मांडवली, त्यातून मिळणारी लाखोंची रक्कम, हप्ता वसुली, जमिनीचे कब्जे आदीच्या मुद्यावरून सुमित ठाकूर आणि त्याच्या टोळीतील गुंडांसोबत वाद सुरू आहे. अशाच एका लाखोंच्या व्यवहारातुन तीन दिवसांपासून पंकज आणि सुमितचे तीन दिवसांपासून फोनवर भांडण सुरू आहे. त्यांनी एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही दिल्या आहे. पोलिसांनी सुमितवर नजर रोखल्यामुळे तो साथीदारांच्या वाहनात फिरूनच आपले काम आटोपतो. हेमंत वानखेडे हा सुमितचा साथीदार आहे. बोरगावमधील दिनशा फॅक्टरी चौकाजवळ शंभू कॅन्टीन जवळ बुधवारी रात्री हेमंतची कार उभी दिसल्याने सुमित आतमध्ये बसून असावा, असा अंदाज बांधून पंकजने हेमंतला शिवीगाळ केली. तू सुमित ठाकूर के साथ घुमता है, कहा है वो, असे म्हणत त्याच्यावर कारच्या मागच्या बाजूने गोळीबार केला. हेमंत खाली वाकल्याने बचावला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. गिट्टीखदान पोलिसांसह मोठा ताफा तेथे दाखल झाला. तोपर्यंत आरोपी पंकज त्याच्या साथीदारांसह फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामी लागली.

छिंदवाड्याकडे आश्रय
आरोपी पंकज या घटनेनंतर त्याच्या गुंड साथीदारांसह फरार झाला. येथील एका गुंडाच्या इशाऱ्यावरून तो छिंदवाड्याकडे पळाल्याचे कळताच पोलीस त्याच्या मागावर गेले. गुरुवारी सायंकाळी तो सावनेरजवळ हाती लागला. त्याला पकडून गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरात आणले. त्याला उद्या कोर्टात हजर केले जाणार असून, त्याचा पीसीआर मिळवण्यात येणार आहे. दरम्यान, पंकजचे आणखी साथीदार घटनेच्या वेळी होते, त्याचाही पोलीस शोध आहेत. पंकजने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र अद्याप सापडले नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. त्याच्या साथीदारांचा शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The infamous Pankaj dhote's musk is built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.