कुख्यात साहिल सय्यदला जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:58 AM2020-09-19T00:58:19+5:302020-09-19T00:59:26+5:30
घर हडपणे, मारहाण करणे, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जामीन मिळण्यासाठी कुख्यात आरोपी साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद (३८) याने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घर हडपणे, मारहाण करणे, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये जामीन मिळण्यासाठी कुख्यात आरोपी साहिल ऊर्फ समीर खुर्शिद सय्यद (३८) याने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या परिस्थितीत साहिलला जामीन दिल्यास तो प्रकरणात हस्तक्षेप करू शकतो असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. बजाजनगर पोलिसांनी डॉ. शशांक चौधरी यांच्या तक्रारीवरून साहिल व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३६४-ए, ३८६, ५०४, ५०६, १२०-ब आणि शस्त्र कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दिवंगत सदाशिव बनसोड यांनी त्यांच्या घराचे डॉ. शशांक चौधरी यांच्या नावाने इच्छापत्र केले आहे. दरम्यान, सदाशिव यांचे नातेवाईक संदीप बनसोड, साहिल व इतर आरोपींनी हे घर हडपण्यासाठी बनावट इच्छापत्र तयार केले. चौधरी यांना घर रिकामे करण्यासाठी धमकी दिली. मारहाण केली अशी तक्रार आहे.