कोरोना काळात गर्भाशयातच कोंडला बालकांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:28+5:302021-06-25T04:07:28+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : आईपासून गर्भाला कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी ‘प्लॅसेंटा’ ही एक मजबूत भिंत म्हणून काम ...

Infant breathing in the womb during corona | कोरोना काळात गर्भाशयातच कोंडला बालकांचा श्वास

कोरोना काळात गर्भाशयातच कोंडला बालकांचा श्वास

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : आईपासून गर्भाला कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी ‘प्लॅसेंटा’ ही एक मजबूत भिंत म्हणून काम करते; परंतु प्लॅसेंटाला छेद देऊन कोरोनाचा विषाणू गर्भापर्यंत पोहोचल्याने ‘स्टिल बर्थ’चे प्रमाण वाढल्याचे प्राथमिक अभ्यासातून समोर आले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी ‘स्टिल बर्थ’ म्हणजे, गर्भाशयातच बालकाच्या मृत्यूची १६०९ प्रकरणे होती, या वर्षी ती वाढून १९९९ वर पोहोचली आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५६७, चंद्रपूर जिल्ह्यात ४४१, तर गडचिरोली जिल्ह्यात ३९७ स्टिल बर्थची प्रकरणे समोर आली आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे गर्भाशयातच बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, अयोग्य जीवनशैलीने हे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी झालेले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, अलीकडच्या काळात कोरोना प्रादुर्भावाचा मोठा परिणाम गर्भाशयावर झाला आहे. कोरोना विषाणूला फुप्फुसांमध्ये वाढण्यासाठी असणारी पोषक परिस्थिती प्लॅसेंटामध्येही असते. गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत प्लॅसेंटा मजबूत झालेली नसते. ती कमकुवत असल्याने विषाणूचा वाढ झाल्यामुळे ही भिंत तुटते आणि गर्भापर्यंत पोहोचते. परिणामी, गर्भाच्या मृत्यूला कारणीभूत ठरते.

-पूर्व विदर्भात १२.३५ टक्के

पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यांत २०२०-२१ या वर्षात १,५९,९२६ बालकांचा जन्म झाला. यात १९९९ म्हणजे १२.३५ टक्के बालकांचा गर्भाशयातच मृत्यू झाला.

-गडचिरोली जिल्ह्यात २३.०७ टक्के

पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात ‘स्टिल बर्थ’चा दर सर्वाधिक आहे. या जिल्ह्यात १६,८१५ बालके जन्माला आली असताना ३९७ म्हणजे, २३.०७ टक्के बालकांचा गर्भाशयातच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात हाच दर १७.७४ टक्के, गोंदिया जिल्ह्यात १६.०८ टक्के, भंडारा जिल्ह्यात १४.५१ टक्के, नागपूर जिल्ह्यात ७.९१ टक्के, तर वर्धा जिल्ह्यात ५.९१ टक्के आहे.

-कोरोना काळात ‘स्टिल बर्थ’मागील ही तीन कारणे

कोरोना काळात स्टिल बर्थ’ची प्रकरणे वाढली आहेत. प्राथमिक अभ्यासानंतर तीन मुख्य कारणे समोर आली आहेत. यातील पहिले म्हणजे, ‘वायरेमिआ’. यात कोरोनाचे विषाणू संपूर्ण शरीरात पसरून प्लॅसेंटामध्ये संसर्ग करतात. दुसरे म्हणजे, ‘सायटोकॉइन’ तर तिसरे कारण म्हणजे, ऑक्सिजन कमी झाल्यामुळे होणारा ‘हायपोक्सिमिया’.

-डॉ. आशिष झरारिया, स्त्र रोग व प्रसूती विभाग, मेडिकल

-पूर्व विदर्भातील स्टिल बर्थची आकडेवारी

जिल्हा २०१९ २०२०

भंडारा २०१ २४३

गोंदिया २५७ २६१

चंद्रपूर ५५३ ४४१

गडचिरोली ३६२ ३९७

वर्धा १०५ ९०

नागपूर १३१ ५६७

Web Title: Infant breathing in the womb during corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.