ट्रेसिंग नसल्याने बाधित रुग्ण ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:26+5:302021-03-28T04:07:26+5:30

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सात दिवसांचे कडक निर्बंध व आता शिथिलतेसह निर्बंध सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. ...

Infected patient 'Sairat' due to lack of tracing | ट्रेसिंग नसल्याने बाधित रुग्ण ‘सैराट’

ट्रेसिंग नसल्याने बाधित रुग्ण ‘सैराट’

googlenewsNext

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सात दिवसांचे कडक निर्बंध व आता शिथिलतेसह निर्बंध सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. यामागे कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने होत नसलेले ‘ट्रेसिंग’, सैराटपणे वावरत असलेले ‘होम आयसोलेशन’चे रुग्ण, दुसरी लाट येण्यापूर्वी न झालेल्या आवश्यक उपाययोजना व सर्वात महत्त्वाचे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत बाळगलेली गुप्तता आदी कारणे दिली जात आहेत.

मागील वर्षी कोरोनाबाधितांच्या संख्येने सप्टेंबर महिन्यात उच्चांक गाठला होता. ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. याचदरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीच्या उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ८०० च्या घरात होती. परंतु प्रशासन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निष्फळ ठरले. याच महिन्यात सर्वाधिक लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम झाले. मॉल्स, दुकाने, पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. यातच ब्रिटन येथून नागपुरात आलेले प्रवासी पॉझिटिव्ह येऊनही त्यांच्या नमुन्यांचा अहवाल देण्यास शासनाने उदासीनता दाखवली. या सर्वांचा प्रभाव मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिसून आला. दैनंदिन रुग्णसंख्या वाढून १२०० च्या घरात गेली. प्रशासनाने आपली निष्क्रियता झाकण्यासाठी शनिवार व रविवार स्वयंस्फूर्त बंदचे आवाहन केले. परंतु इतर दिवशी गर्दीने फुलत असलेल्या बाजारपेठा व विविध कार्यक्रमांकडे दुर्लक्ष केले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या २००० वर गेली. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले गेले. परिणामी, १५ ते २१ मार्चपर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट याला फारसे कोणी गंभीरतेने घेतले नाही. यामुळे रुग्णसंख्या वाढून ३००० ते ४००० वर जात आहे. आता स्थिती हाताबाहेर गेल्याने ही संख्या आणखी वाढणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Infected patient 'Sairat' due to lack of tracing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.