काटोल, सावनेर तालुक्यातही संक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:29+5:302021-05-16T04:08:29+5:30

सावनेर तालुक्यातही २९ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात सावनेर शहरातील चार तर ग्रामीण भागातील २५ रुग्ण आहेत. शिवाय, ...

Infection also in Katol, Savner taluka | काटोल, सावनेर तालुक्यातही संक्रमण

काटोल, सावनेर तालुक्यातही संक्रमण

googlenewsNext

सावनेर तालुक्यातही २९ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात सावनेर शहरातील चार तर ग्रामीण भागातील २५ रुग्ण आहेत. शिवाय, चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुही तालुक्यात २८० नागरिकांच्या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात २१ जण काेराेना संक्रमित असल्याचे आढळून आले. यात तालुक्यातील तितूर प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये १३, कुही ग्रामीण रुग्णालय व मांढळ, वेलतूर व साळवा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रत्येकी दाेन नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली.

हिंगणा तालुक्यात ५१६ नागरिकांच्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, यातील २१ जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यात वानाडोंगरी येथील सात, हिंगणा व इसासनी येथील प्रत्येकी तीन, जुनेवानी येथील दाेन, रायपूर, कान्होलीबारा, डिगडोह, सालईमेंढा, नीलडोह व आजनगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आहे. तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या ११,३०६ झाली असून, १०,०१६ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे.

रामटेक तालुक्यात १० रुग्णांची नाेंद करण्यात आल्याने तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ६,३९८ झाली आहे. यातील ५,८२८ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्से दाेन रुग्ण रामटेक शहरातील असून, आठ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात सध्या ५६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी संयुक्तरित्या दिली.

Web Title: Infection also in Katol, Savner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.