उमरेड, काटाेलमध्येही संक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:32+5:302021-04-25T04:08:32+5:30
कुही तालुक्यात ७९ रुग्ण आढळून आले. यात कुही ग्रामीण आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील कुही ९, मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रातील ...
कुही तालुक्यात ७९ रुग्ण आढळून आले. यात कुही ग्रामीण आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील कुही ९, मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील २४, वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील ३५, साळवा प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील ७ तर तितूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील गावांमधील चार रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३,१६६ झाली आहे.
रामटेक तालुक्यात ७७ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात रामटेक शहरातील आठ तर ग्रामीण भागातील ६९ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आजवर ५,०१० नागरिकांना काेराेनाची लागण झाली असून, यातील २,७१३ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या तालुक्यात २,२९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी दिली.