रामटेक, काटाेल माैदा येथे संक्रमण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:07 AM2021-03-29T04:07:17+5:302021-03-29T04:07:17+5:30
काटाेल तालुक्यात ५४ रुग्णांची भर पडली आहे. यात काटाेल शहरातील ३२ तर ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. काटाेल ...
काटाेल तालुक्यात ५४ रुग्णांची भर पडली आहे. यात काटाेल शहरातील ३२ तर ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. काटाेल शहरातील ३२ रुग्णांमध्ये पंचवटी येथील नऊ, आययूडीपी येथील तीन, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, वडपुरा, जानकीनगर व धंतोली येथील प्रत्येकी दोन रुग्ण तर खोजा लेआऊट, जानकीनगर, शिंदे लेआऊट, हत्तीखाना, पेठबुधवार, होळी मैदान, गळपुरा, पोलीस ठाणे, शारदा चौक व भाटपुरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील २२ रुग्णांमध्ये कोंढाळी येथील पाच, रिधोरा, सोनोली व वंडली येथील प्रत्येकी दोन तर पानवाडी, चिचाळा, खानगाव, चारगाव, डोंगरगाव, मसली, कुकडीपांजरा, दुधाळा, गोन्ही, कारला, पानवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
माैदा तालुक्यात रविवारी ६४ नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या असून, यातील ३२ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या १,००४ झाली असून, यातील ७७१ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, २०३ रुग्णांवर उपचार सुरू असून, ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नरखेड तालुक्यातही सात रुग्ण आढळून आले आहेत. यात एक रुग्ण नरखेड शहरातील असून, तालुक्यातील माेवाड शहरातील तीन, सावरगाव येथील दाेन तर मेंढला येथील एक रुग्ण आहे. दरम्यान, कुही तालुक्यातही काेराेना रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे.