संक्रमण थांबता थांबेना; बाधितांचा आकडा ७७७१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:11+5:302021-04-26T04:07:11+5:30

एका दिवसात ८७ मृत्यू : ५१३० कोरोनामुक्त झाले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कठोर निर्बंध घातल्यानंतरही ...

Infection does not stop; The number of victims is 7771 | संक्रमण थांबता थांबेना; बाधितांचा आकडा ७७७१

संक्रमण थांबता थांबेना; बाधितांचा आकडा ७७७१

Next

एका दिवसात ८७ मृत्यू : ५१३० कोरोनामुक्त झाले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कठोर निर्बंध घातल्यानंतरही नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा आकडा कमी होताना दिसत नाही. एप्रिल महिन्यात सलग पाचव्या दिवशी सात हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एका दिवसात ७,७७१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात संक्रमणाचा प्रकोप सुरू आहे. रविवारी ५,१३० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

रविवारी २४,७०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी मिळालेल्या संक्रमितांमध्ये शहरातील ४,७२०, ग्रामीणमधील ३,०४० व जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये शहरातील ४६, ग्रामीणमधील ३०, जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. रविवारी ५,१३० जण कोरोनामुक्त झाले. यात शहरातील ३,९२२, ग्रामीणमधील १,७३८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत २,८९,६९६ संक्रमित कोरोनामुक्त झाले असून, रिकव्हरी रेट ७७.४२ टक्के आहे.

...

२४ तासात २४,७०१ नमुन्यांची तपासणी

नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात संक्रमण झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत २१ लाख ५८ हजार ३९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गेल्या २४ तासात २४,७०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील १६,३७९ तर ग्रामीणमधील ८,३२२ नमुने आहेत.

...

सक्रिय ७७ हजारांहून अधिक

नागपूर जिल्ह्यात संक्रमित रूग्णांची संख्या ७७,५५६पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील ४७,०६७ तर ग्रामीणमधील ३०,४८९ रूग्ण आहेत. मागील काही दिवसात शहरातील संक्रमण कमी होताना दिसत नाही. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

वाढणारे संक्रमण व मृत

१९ एप्रिल ६३६४ ११३

२० एप्रिल ६८९० ९१

२१ एप्रिल ७२२९ ९८

२२ एप्रिल ७३४४ ११०

२३ एप्रिल ७४८५ ८२

२४ एप्रिल ७९९९ ८२

२५ एप्रिल ८७

ॲक्टिव्ह ७७,५५६

कोरोनामुक्त २,८९,६९६

मृत - ६,९३६

.........

Web Title: Infection does not stop; The number of victims is 7771

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.