ग्रामीण भागात संक्रमणाचा दर १२ टक्क्यांवरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:08 AM2021-05-22T04:08:50+5:302021-05-22T04:08:50+5:30
सावनेर/ काटोल/ उमरेड/ कळमेश्वर/ कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर शहरात कोरोनाची लाट ओसरत असताना ग्रामीण भागात संक्रमणाचा दर अद्यापही ...
सावनेर/ काटोल/ उमरेड/ कळमेश्वर/ कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर शहरात कोरोनाची लाट ओसरत असताना ग्रामीण भागात संक्रमणाचा दर अद्यापही १२ टक्क्यांपर्यंत कायम आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ४,९२४ चाचण्यांपैकी ५७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७,९७९ इतकी आहे. शुक्रवारी ग्रामीण भागातील १,७९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात आतापर्यंत १,३९,०४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,२८,५०४ रुग्ण बरे झाले आहेत, तर २,२३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सावनेर तालुक्यात १६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील एक, तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात २६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४, तर ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. काटोल तालुक्यात ४७३ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ४, तर ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्रांतर्गत १२, कोंढाळी (४), तर येनवा केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ९ रुग्णांची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर शहरातीस ९, तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात दहेगाव, खापरी, आदासा येथे प्रत्येकी दोन, तर भंडागी, बुधदा, तेलकामठी, तिडंगी, नादीखेडा, उबगी, सोनेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात ३७२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही व मांढळ येथे प्रत्येकी एक, तर वेलतूर व तितूर येथे प्रत्येकी चार रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ४८२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत ५२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. वानाडोंगरी येथे १७, डिगडोह (१०), हिंगणा (५), घोडेघाट (४), निलडोह व टाकळघाट येथे प्रत्येकी ३, खैरीपन्नासे, मांगली, इसासनी, पांजरी येथे प्रत्येकी २, तर मोहगाव व वडधामना येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११,६५३ इतकी झाली आहे. यातील १०,६६३ कोरोनामुक्त झाले, तर २६२ रुग्णांचा मृत्यू झाला.
रामटेकला दिलासा
रामटेक तालुक्यात शुक्रवारी केवळ तीन रुग्णांची नोंद झाली. रामटेक शहरात एकाही रुग्णाची नोंद नाही. बाधित तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ६,४६४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६,१५६ कोरोनामुक्त, तर १२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.