नागपुरात १३ लाखाची निकृष्ट सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:31 PM2020-05-05T21:31:27+5:302020-05-05T21:33:28+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाने स्मॉल फॅक्टरी एरिया, कळमना येथील २०९ आणि २१० क्रमांकाच्या प्लॉटवर सुरू असलेल्या सुपारी कारखान्यामध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी असल्याच्या संशयावरून मंगळवारी धाड घातली. या धाडीत १३ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीची सुपारी जप्त केली आणि कारखान्याला सील ठोकले.

Inferior betel nut worth Rs 13 lakh seized in Nagpur | नागपुरात १३ लाखाची निकृष्ट सुपारी जप्त

नागपुरात १३ लाखाची निकृष्ट सुपारी जप्त

Next
ठळक मुद्देएफडीएची कारवाई : आंबा विक्रे त्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने स्मॉल फॅक्टरी एरिया, कळमना येथील २०९ आणि २१० क्रमांकाच्या प्लॉटवर सुरू असलेल्या सुपारी कारखान्यामध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी असल्याच्या संशयावरून मंगळवारी धाड घातली. या धाडीत १३ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीची सुपारी जप्त केली आणि कारखान्याला सील ठोकले.
धाडीदरम्यान सुपारी कारखान्याचा मालक हा अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड यांना धक्का मारून पळून गेला. त्याचे नाव कळू शकले नाही. या संदर्भात कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस मालकाचा शोध घेत आहेत. प्राप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी धाड घातली तेव्हा कारखान्याला कुलूप होते. नियमाप्रमाणे कारखान्याचे कुलूप तोडून व पंचासमक्ष पंचनामा केला. कारखान्यात १३ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीचा ४,३६५ किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा आढळून आला. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

तसेच सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे आंबे कार्बाईड या घातक रसायनाद्वारे पिकविले जातात. कार्बाईडचा उपयोग करून आंबे पिकविणाºया विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांतर्फे कृ षी उत्पन्न बाजार समिती, कळमना येथील घाऊक मंडीमध्ये धडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत एकूण पाच घाऊक आंबे विक्रे त्यांची तपासणी करण्यात आली व अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते आणि अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात नागपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, आनंद महाजन, विनोद धवड, ललित सोयाम, अनंत चौधरी, अमितकुमार उपलप, महेश चहांदे यांनी केली. पुढील काळातही खाद्यपदार्थांमध्ये भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन नागपूरतर्फे अशा प्रकारची मोहीम सुरू राहणार आहे. ग्राहकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल काही तक्रार असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
 

Web Title: Inferior betel nut worth Rs 13 lakh seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.