निकृष्ट नमुने अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:27+5:302021-09-04T04:11:27+5:30
गरोबा मैदान परिसरातील ज्या अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार मिळाल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्या तक्रारीच्या आधारावर बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ...
गरोबा मैदान परिसरातील ज्या अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार मिळाल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्या तक्रारीच्या आधारावर बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तेथील पोषण आहाराचे काही नमुने ताब्यात घेतले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पााठविण्यात येतील. अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांचे म्हणणेसुद्धा ऐकून घेतले.
-----
लाभार्थ्यांच्या तक्रारीनंतर महिला व बाल विकास सेवा प्रकल्प अधिकाऱ्यांनी या पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. त्यात भेसळ आहे की नाही, हे आताच सांगता येत नाही. प्रयोगशाळेच्या रिपोर्टनंतर ते स्पष्ट होईल.
-सचिन जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी
सखोल चौकशी व्हावी
चार महिने होऊनही पाोषण आहार मिळाला नाही म्हणून मी स्वत: विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पोषण पुरवठा करण्यात आला. त्यातही तो निकृष्ट दर्जाचा मिळाला. यापूर्वी जरीपटका येथील प्रकारही आपण उघडकीस आणलेला आहे. पोषण आहारात मोठा घोटाळा सुरू आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांचे संगनमत आहे. या विषयावर आम्ही लढतोय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींना निवेदनही पाठविले आहे.
-रत्नमाला मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या