निकृष्ट सोयाबीनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:06+5:302021-07-11T04:07:06+5:30

नागपूर : यावर्षी जून आणि जुलै महिन्यात गेल्यावर्षीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ७५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असला तरीही दिवाळीपूर्वी मुहूर्तावर ...

Inferior soybeans hit farmers hard | निकृष्ट सोयाबीनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

निकृष्ट सोयाबीनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Next

नागपूर : यावर्षी जून आणि जुलै महिन्यात गेल्यावर्षीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ७५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असला तरीही दिवाळीपूर्वी मुहूर्तावर ४५०० रुपये आणि नंतर सोयाबीन कमी दर्जाचे व ओले असल्याच्या कारणाने शेतकऱ्यांना ३ हजारांखाली भाव मिळाला होता. आता मुख्य बाजारपेठांमध्ये फार कमी शेतकरी आणि जास्त व्यापारी सोयाबीन विक्रीला आणत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना जास्त फायदा तर शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. अशीच स्थिती महाराष्ट्रातील सर्वच बाजारपेठांमध्ये आहे.

सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव

गेल्यावर्षी भाव कमी मिळाल्याने यंदा जास्त शेतकरी कापसाकडे वळले आहेत. गेल्यावर्षी नागपूर विभागात २ लाख ९७ हजार ४२२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यानुसार आठ विभागात एकूण ४३ लाख २३ हजार ७०७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यंदाच्या सोयाबीन पिकाची एकूण आकडेवारी सप्टेंबर महिन्याअखेर जाहीर होणार आहे. अधिकारी म्हणाले, गेल्यावर्षी सोयाबीन कापणीला येण्याआधी मूळकुज व खोरकीड या किडीचा प्रादुर्भाव आणि येलोमोझॅक हा बुरशीजन्स रोग सोयाबीनवर आल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. किडीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते, पण मातीत सल्फरचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या काही वर्षांपासून किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. याशिवाय परतीच्या पावसामुळे शेतातील पीक खराब झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ओल्या पिकाची कापणी करावी लागली होती. त्याचा दर्जाही निकृष्ट होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला. साठवणीचे सोयाबीन शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळाल्यानंतरच जून आणि जुलै महिन्यात विक्रीला आणले. दरवर्षी उतारा कमी होत असल्याने नागपूर विभागात गेल्यावर्षीच्या ३ लाख हेक्टरच्या तुलनेत २ लाख हेक्टर शेतजमिनीवर लागवड होणार असल्याची माहिती आहे.

जून, जुलैमध्ये भाववाढीची कारणे

उत्तम दर्जाच्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने ऑईल मिलर्सला चांगल्या प्रतीचे सोयाबीन कमी मिळाले. त्याच कारणामुळे दिवाळीत ९५ रुपये किलो असलेल्या सोयाबीनचे दर जून महिन्यात १६५ रुपयांवर पोहोचले होते. आता कच्च्या सोयाबीन तेलाची आयात सुरू झाल्यानंतर भाव १५५ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. ऑईल मिलर्सनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आयात केली. हेसुद्धा दर्जेदार सोयाबीनच्या दरवाढीसाठी कारणीभूत आहे. नागपूर विभागात कळमना बाजारात दररोज ७०० ते ८०० क्विंटल सोयाबीनची आवक आहे.

सोयाबीनचा पेरा वाढणार

गेल्यावर्षी तुलनेत यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. त्यांना बियाणे उपलब्ध करून दिली असून शेतकऱ्यांसाठी बीज उत्पादकता कार्यक्रम राबविला आहे.

मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, नागपूर जिल्हा.

सोयाबीनला भाव कमी मिळाला

गेल्यावर्षी सोयाबीनचा दर्जा निकृष्ट असल्याने शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला. दर्जेदार सोयाबीनची साठवण केलेल्या शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त भाव मिळत आहे. बाजारात पूर्वीच्या तुलनेत आवक फारच कमी आहे.

अतुल सेनाड, अध्यक्ष, कळमना उत्पन्न कृषी धान्य बाजार.

वर्ष २०२० मध्ये विभागनिहाय हेक्टरवर सोयाबीन पेरणी :

कोकणशून्य हेक्टर

नाशिक१,४६,५२५

पुणे१,८०,७५८

कोल्हापूर १,५९,५४९

औरंगाबाद४,०६,७१३

लातूर १७,१७,१५०

अमरावती१४,१५,५९०

नागपूर २,९७,४२२

Web Title: Inferior soybeans hit farmers hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.