संत्रा, माेसंबीवर फळमाशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:02+5:302021-08-21T04:13:02+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : वातावरणातील प्रतिकूल बदल तसेच कीड व राेगांना प्रतिबंधक नसलेल्या कलमांमुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील ...

Infestation of fruit flies on oranges | संत्रा, माेसंबीवर फळमाशीचा प्रादुर्भाव

संत्रा, माेसंबीवर फळमाशीचा प्रादुर्भाव

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : वातावरणातील प्रतिकूल बदल तसेच कीड व राेगांना प्रतिबंधक नसलेल्या कलमांमुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील संत्रा व माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात फळमाशी, ब्राऊन राॅट व कॉलेटोट्रायकम या किडी व बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटक व बुरशीनाशकांची फवारणी करूनही कीड व राेग नियंत्रणात येत नसल्याने तसेच माेठ्या प्रमाणात फळगळ वाढल्याने शेतकरी चिंतित आहेत.

दाेन्ही तालुक्यांमध्ये संत्रा व माेसंबीच्या बागांवर या किडी व राेगांचा प्रादुर्भाव हाेत असल्याने शेतकऱ्यांना बागा जगवण्यासाठी व त्यातून उत्पादन घेण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत असून, खर्च करावा लागत आहे. या राेगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर माेठ्या प्रमाणात फळे गळायला सुरुवात हाेते. ही फळगळ थांबविण्यासाठी महागड्या कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी केल्यानंतरही राेग व किडी नियंत्रणात येत नाही, अशी माहिती संत्रा व माेसंबी उत्पादकांनी दिली.

या कीड व राेगामुळे दाेन वर्षांपासून फळगळ हाेत असून, माेठे आर्थिक नुकसान हाेत असल्याची माहिती मनोहर चौधरी, ईश्वर पुंड, नितीन राठी, चंद्रशेखर बेलखेडे, राजेश मक्कर, गोपाल गुप्ता, मनीष हरजाल, विशाल वानखेडे, मोहन चरडे, अनिल सोनक, जगदीश बेले, जितेंद्र कोतेवार, विक्रम वानखेडे, राजेश जयस्वाल, भूषण ठाकूर, वैभव काळे, आशिष कडू या संत्रा व माेसंबी उत्पादकांनी दिली. बागा वाचविण्यासाठी ही महागडी औषधे शासनाने अनुदानावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

..

‘जीएम सीड’ परवानगी द्या

कपाशीवर गुलाबी बाेंडअळी, तर साेयाबीनवर खाेडमाशी व यल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव हाेत असल्याने ही दाेन्ही नगदी पिके मागील काही वर्षांपासून हातची जात आहे. पिकांना वाचविण्याच्या प्रयत्नात उत्पादनखर्च वाढत असून, उत्पादन घटत आहे तसेच पिकांचा दर्जाही खालावत आहे. देशात उपलब्ध आलेली या दाेन्ही पिकांवर बियाणे किडींना प्रतिबंधक राहिली नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने ‘जीएम सीड’ला परवानगी द्यावी, अशी मागणी मदन कामडे, परिक्षित चरपे, संदीप सेंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

संत्रा, मोसंबीवर चट्टे पडून फळ देठापासून कमकुवत हाेते व गळायला सुरुवात हाेते. बाग साफ करणे, औषधांची फवारणी करणे, पाण्याचा याेग्य निचरा हाेईल याची काळजी घेणे यासह कृषितज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययाेजना केल्या. पण फळगळ थांबली नाही.

- वैभव काळे, शेतकरी

...

मागील काही वर्षांपासून फळमाशी व बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला आहे. पूर्वी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर औषधे दिली जायची. ही याेजना बंद केल्याने कृषिमंत्री दादा भुसे यांना भेटून निवेदन दिले व पत्रव्यवहार केला. परंतु, उपयाेग झाला नाही. शासनाने ही याेजना पुन्हा सुरू करायला पाहिजे.

- डाॅ. अनिल ठाकरे, शेतकरी

...

वातावरणातील बदल किडी व बुरशीजन्य राेगाच्या पथ्यावर पडतात. कृषी विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- सुरेश कन्नाके,

तालुका कृषी अधिकारी, काटाेल

...

200821\img-20210819-wa0191.jpg~200821\img-20210808-wa0188.jpg

काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी गळ~काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी गळ

Web Title: Infestation of fruit flies on oranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.