साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:48+5:302021-07-19T04:07:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस बरसल्याने साेयाबीनच्या पिकाची झपाट्याने वाढ व्हायला सुरुवात झाली. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस बरसल्याने साेयाबीनच्या पिकाची झपाट्याने वाढ व्हायला सुरुवात झाली. त्यातच पावसाने दडी मारल्याने तसेच किडींना पाेषक वातावरण निर्माण झाल्याने हिंगणा तालुक्यातील साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली आहे. पिकाला किडीपासून वाचविण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रादुर्भावग्रस्त शेताची पाहणी सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहेे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे यांनी दिली.
मंडळ कृषी अधिकारी राजू धनविजय, कृषी पर्यवेक्षक युवराज चाैधरी, कृषी सहायक मुक्ता शिरसाट यांनी नुकतीच हिंगणा तालुक्यातील देवळी (सावंगी) शिवारातील सुनील पाेफळी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील साेयाबीनच्या पिकाची पाहणी केली. त्यांना या शिवारात साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. खाेडमाशीची अळी सुरुवातीला पिकाची पाने खाते. त्यानंतर पानाच्या देठातून आत प्रवेश करीत संपूर्ण खाेड पाेखरते. आतील भाग पाेरखल्याने झाडांना पाेषक व इतर अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे झाड पिपळे पडून सुकायला सुरुवात हाेते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे यांनी दिली. ही कीड घातक असल्याने त्याच्या बंदाेबस्तासाठी याेग्य उपाययाेजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
....
या उपाययाेजना करा
साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यावर निंबाेळी अर्काची किंवा इथियाॅन किंवा इंडाेक्साकार्ब किंवा क्लाेरॅट्रॅनिप्राेल या कीटकनाशकांची फवारणी करावी. प्रादुर्भाव अधिक असल्यास थाॅयमिथाॅक्झाॅन, लॅम्बडा सायहॅलाेथ्रीलची फवारणी करावी, असा सल्ला डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांनी दिला आहे.
फवारणी करावी.