सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:38+5:302021-08-12T04:12:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा/मेंढला : नरखेड तालुक्यातील मेंढला परिसरात साेयाबीनच्या पिकावर माेठ्या प्रमाणात खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाला असून, पीक धाेक्यात ...

Infestation of weevils on soybean crop | सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव

सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा/मेंढला : नरखेड तालुक्यातील मेंढला परिसरात साेयाबीनच्या पिकावर माेठ्या प्रमाणात खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाला असून, पीक धाेक्यात आले आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी या कीडग्रस्त पिकाची पाहणी करीत खाेडमाशीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या भागातील शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकावर खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याची तक्रार केली हाेती, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी दिली. त्याअनुषंगाने कृषी विभागाच्या चमूने या भागातील वेगवेगळ्या शेतात जाऊन साेयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. शिवाय, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाययाेजना सुचविल्या.

या पाहणी दाैऱ्यात जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, मंडल कृषी अधिकारी कुणाल ठाकूर, कृषी पर्यवेक्षक ओ. व्ही. गहूकर, कृषी सहाय्यक आर. व्ही. निमजे, कृषी सहाय्यक अमित वानखडे सहभागी झाले हाेते. यावेळी रमेश चरपे, पुरुषोत्तम दंढारे, उमेश चरपे, अतुल दंढारे, अर्जुन चरपे, दामोदर सेंबेकर, केशव चरपे, आशिष दंढारे, मोहन सेंबेकर, अतुल लायबर, भावेश चरपे, भोजराज इंगोले, पंकज वाडबुदे, चंद्रशेखर दंढारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

...

खाेडमाशीमुळे साेयाबीनच्या पिकाचे माेठे नुकसान हाेत असून, उत्पादनात घट हाेते. त्यामुळे या किडीचे वेळीच याेग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी इथिऑन किंवा इंडोक्झिकार्ब किंवा क्लोरॉन्ट्रिनिपोल या कीटकनाशकांची तातडीने फवारणी करावी. या किडीच्या प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात थायमेथाेक्झाम व लॅम्बडॅसिलाेहॅथ्रीन या औषधांची फवारणी केल्यास ही कीड आटाेक्यात येते. पांढरी माशीच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामाप्राइड व स्टाेप्टाेसायकलीन तसेच कपाशीवरील गुलाबी बाेंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्राेफेनाेफाॅस व सायपरमेथ्रीनची फवारणी करावी.

- डाॅ. याेगीराज जुमडे,

तालुका कृषी अधिकारी, नरखेड

Web Title: Infestation of weevils on soybean crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.