नागपूरच्या ग्रामीण व नववसाहत क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:46 AM2020-05-24T10:46:23+5:302020-05-24T10:47:33+5:30
बुटीबोरीत पहिल्यांदाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. येथील ५२ वर्षीय वडील व २५ वर्षीय मुलाला एम्सच्या कोविड वॉर्डात भरती करण्यात आले. या दोघांसह सहा रुग्णांची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुटीबोरीत पहिल्यांदाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. येथील ५२ वर्षीय वडील व २५ वर्षीय मुलाला एम्सच्या कोविड वॉर्डात भरती करण्यात आले. या दोघांसह सहा रुग्णांची नोंद झाली. यात एक भिकारी, एक गर्भवती व मुंबईवरून नागपुरात लपून आलेला प्रवासी आहे. रुग्णांची एकूण संख्या ४१६ झाली आहे.
नागपुरात रुग्णांची संख्या मंदावली आहे. परंतु नव्या वसाहतीतून व ग्रामीण भागातून रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. ग्रामीण भाग असलेल्या कन्हान, कामठी व कोंढाळीत रुग्णाची नोंद झाली होती. आता बुटीबोरीतही रुग्ण आढळून आला आहे. चार दिवसांपूर्वी इतवारी भागात एका भिकाऱ्याची प्रकृती खालावल्याने एका पोलीस कर्मचाºयाने त्याला रुग्णालयात भरती केले. त्याचा नमुना तपासला असता आज पॉझिटिव्ह अहवाल आला. यासोबतच मुंबईहून नागपुरात लपून प्रवास करून आलेल्याचा व एका गर्भवतीचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे.