कळमना मार्केटमध्ये आंब्यांची आवक घटली; आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 03:09 PM2023-05-24T15:09:08+5:302023-05-24T15:09:32+5:30

५० ते ६० रुपये विकला जाणारा आंबा आता फक्त ३० ते ४० रुपयांच्या दरात मार्केटमधून फळविक्रेत्यांना विकला जात आहे.

Inflow of mangoes decreased in Kalmana market; Increase in rates due to decline in income | कळमना मार्केटमध्ये आंब्यांची आवक घटली; आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ

कळमना मार्केटमध्ये आंब्यांची आवक घटली; आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ

googlenewsNext

भारतात आंबा हे सर्वात लोकप्रिय फळ आहे. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध या आंब्याची  जगात ख्याती आहे. वर्षभर लोक आंब्यांची वाट बघत असतात , नागपुरातील कळमना मार्केट सध्या आंब्यांच्या ढिगांनी सजलेले आहे. यंदा अवकाळी पावसामुळे आंब्यांवर मंगु रोग आल्यामुळे या आंब्यांचे दार घसरले आहेत.

५० ते ६० रुपये विकला जाणारा आंबा आता फक्त ३० ते ४० रुपयांच्या दरात मार्केटमधून फळविक्रेत्यांना विकला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांपर्यंत हा आंबा आता ५० ते ६० रुपये किलो च्या दराने पोहोचत आहे. नागपुरात हे आंबे कर्नाटक वरून येत आहेत, तर नागपूरच्या कळमना मार्कटमधून या आंब्यांची उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , ओडिशा, छत्तीसगड आणि नेपाळ सह विविध राज्यांमध्ये विक्री होत आहे. एका गाडीत किमान ५ ते १० टन अशाप्रकारे किमान १५० ट्र्क आंबा दररोज कळमना मार्केट मध्ये उतरवला जात आहे. 

Web Title: Inflow of mangoes decreased in Kalmana market; Increase in rates due to decline in income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.