शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील डॉक्टर टॅबवर नोंदविणार रुग्णांच्या उपचाराची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:12 PM2020-02-20T12:12:52+5:302020-02-20T12:13:18+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लवकरच रुग्णांच्या उपचाराशी संबंधित माहिती टॅबवर नोंदविणार आहे. त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाऊन कॉम्प्युटरवरून माहिती मिळविण्याची कसरत आता करावी लागणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लवकरच रुग्णांच्या उपचाराशी संबंधित माहिती टॅबवर नोंदविणार आहे. त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाऊन कॉम्प्युटरवरून माहिती मिळविण्याची कसरत आता करावी लागणार नाही. टॅबमुळे उपचाराला गती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) एचएमआयएसच्या मुख्य समन्वयक स्नेहा यांनी सांगितले की, ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम’ टॅबवर आॅपरेट होणार आहे. या प्रोजेक्टच्या तांत्रिक अडचणीसुद्धा सोडविण्यात आल्या आहे. एक्स-रे साठी जास्त स्पेस लागत होती. ही अडचणही सोडविण्यात आली आहे. यासंदर्भात डॉक्टरांशी बैठक झाली आहे. एचएमआयएसने अंमलबजावणीसाठी मेडिकलच्या अधिष्ठाताने पत्र द्यावे, अशी विनंती केली आहे. विशेष म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या उपचाराशी जुळलेली सर्व माहिती, तपासणी रिपोर्ट, औषधी ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम’ या सॉफ्टवेअरवर नोंदविण्यात येते. त्यासाठी डॉक्टरांना रुग्णांच्या संदर्भातील सर्व माहिती कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करावी लागते. बरेचदा वॉर्र्डामध्ये काम्प्युटर नसतात. त्यामुळे उपचार करता करता माहिती घेण्यासाठी दुसºया वार्डमध्ये जावे लागते. त्याचा उपचारावर परिणाम होतो. बरेचदा वेळेवर माहिती न मिळाल्यास डिस्चार्ज कार्ड बनत नाही. उपचारात येत असलेल्या या अडचणी सोडविण्यासाठी मेडिकल मार्डच्या डॉक्टरांनी ‘एचएमआयएस आॅन टॅब’ नावाने एक प्रोजेक्ट तयार केले. मेडिकल प्रशासन व एचएमआयएस प्रशासनाच्या नियंत्रणात सहा महिन्यापूर्वी याचे यशस्वी परीक्षण झाले.
तरीसुद्धा अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. रुग्णालय प्रशासनाने या यंत्रणेला उपयुक्त असल्याचे सांगितले होते. या यंत्रणेची अंमलबजावणी करावी, अशी डॉक्टरांची मागणी होती. परंतु एचएमआयएस विभाग मुकदर्शक बनला होता. लोकमतने यासंदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल मेडिकल प्रशासन व एचएमआयएसने घेतली.