अखेर माहिती आयोगाला मिळाले तीन आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 09:15 PM2021-09-17T21:15:26+5:302021-09-17T21:31:51+5:30
Nagpur News राज्य माहिती आयुक्तपदावर तीन आयुक्तांची अखेर नेमणूक करण्यात आली. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय आणि पत्रकार राहुल भालचंद्र पांडे या तिघांची या पदावर नियुक्ती झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य माहिती आयुक्तपदावर तीन आयुक्तांची अखेर नेमणूक करण्यात आली. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय आणि पत्रकार राहुल भालचंद्र पांडे या तिघांची या पदावर नियुक्ती झाली आहे. या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून, राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली. (The Information Commission finally got three commissioners; Nagpur-based journalist Rahul Pandey)
माहिती आयोगाकडे अनेक महिन्यांपासून आयुक्तांची पदे रिक्त होती. राज्यातील आठपैकी चार खंडपीठांचा कारभार प्रभारीभरोसे सुरू होता. त्यामुळे माहिती आयोगाकडे ७४ हजारांहून अधिक तक्रारी व द्वितीय अपिले प्रलंबित होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या नेमणुकीला हिरवी झेंडी दिली. तीन नवीन राज्य माहिती आयुक्त मिळाल्याने आयोगाच्या कामाची गती वाढेल व प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.