अमानुष! मित्राने केली मित्राची हत्या; मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 09:47 PM2022-02-11T21:47:55+5:302022-02-11T21:48:27+5:30
Nagpur News एकाच ठिकाणी एकाच पदावर नाेकरी करीत असलेल्या मित्राने दुसऱ्याची हत्या केली आणि मृतदेह पाेत्यात बांधून कालव्यात फेकला.
नागपूर : एकाच ठिकाणी एकाच पदावर नाेकरी करीत असलेल्या मित्राने दुसऱ्याची हत्या केली आणि मृतदेह पाेत्यात बांधून कालव्यात फेकला. तीन दिवसानंतर आराेपीने पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण करून खुनाची माहिती दिली. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भूगाव शिवारात साेमवारी (दि.७) रात्री घडली असून, गुरुवारी (दि.१०) मध्यरात्री उघडकीस आली.
नितीन शिवदास राजपांडे (२५, रा. भूगाव, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव असून, विशान ऊर्फ माेंट्या गुणवंत नारनवरे (२२, रा. वरंभा, ता. कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.
नितीन व माेंट्या दाेघेही गुमथळा (ता. कामठी) शिवारातील नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नाेकरी करायचे. त्यामुळे त्यांची आपसात चांगली हाेती. शिवाय, मैत्री असल्याने दाेघेही साेबत कामावर जायचे आणि कामावरून घरी परत यायचे. दाेघेही साेमवारी रात्री साेबत कामावर गेले हाेते. मात्र, नितीन मंगळवार व बुधवारी घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी इतरांकडे चाैकशी करीत माैदा पाेलीस ठाण्यात ताे बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली हाेती.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री माेंट्याने माैदा पाेलीस ठाणे गाठून समर्पण केले आणि आपण नितीनचा खून केल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून नितीनचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पाेत्यात बांधून भूगाव शिवारातील कालव्यात फेकला हाेता. नितीनचे दाेन्ही हात दाेरीने बांधले हाेते. शिवाय, त्याच्या चेहरा व डाेक्यावर दगडाने वार केल्याच्या गंभीर जखमी हाेत्या. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील सरकारी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आराेपी विशाल ऊर्फ माेट्या नारनवरे यास अटक केली.