गुन्हेगार मेव्हण्यांनी केली जावयाची अमानुष हत्या

By admin | Published: August 9, 2016 02:43 AM2016-08-09T02:43:59+5:302016-08-09T02:43:59+5:30

बहिणीला डोळ्यादेखत होत असलेली मारहाण पाहून संतप्त झालेल्या भावांनी जावयाची अमानुष हत्या केली.

Inhuman killing of criminal benches | गुन्हेगार मेव्हण्यांनी केली जावयाची अमानुष हत्या

गुन्हेगार मेव्हण्यांनी केली जावयाची अमानुष हत्या

Next

नागपूर : बहिणीला डोळ्यादेखत होत असलेली मारहाण पाहून संतप्त झालेल्या भावांनी जावयाची अमानुष हत्या केली. रविवारी सकाळी नंदनवनमध्ये ही थरारक घटना घडली. अरविंद रूपचंद पराते असे मृताचे नाव आहे.
गुन्हेगारी वृत्तीचा अरविंद वादग्रस्त प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचा. त्याच्या पत्नीचे नाव अलका असून ती कुख्यात गुंड गज्जू वंजारीची बहीण आहे. गज्जू हा नागपुरातील एका मोठ्या गुन्हेगारी टोळीतील सदस्य असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलकाचा छळ होत असल्यामुळे गज्जू आणि त्याचा भाऊ राजू याचे जावई अरविंदसोबत अजिबात पटत नव्हते. आर्थिक व्यवहारातूनही त्यांच्यात वैमनस्य आले होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. काही दिवसांपासून अरविंदने अलका हिला मारहाण करणे, शिवीगाळ करण्याचा नित्यक्रम केला. छळ असह्य झाल्याने तीन दिवसांपूर्वी अलकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घरगुती वाद म्हणून पोलिसांनी त्यावेळी दोघांनाही समज दिली.

फरार गज्जूही जेरबंद
जावयाची हत्या केल्यानंतर आरोपी गज्जू पळून गेला. तर, ही हत्या आपणच केली असे सांगून राजूने स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. नंदनवन पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आरोपी राजूचा रक्तदाब आणि शुगर अचानक वाढली. त्याची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये भरती केले. दुसरीकडे आज दुसऱ्या दिवशी पाचपावली भागात आरोपी गज्जूला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आणखी कुणी आरोपी आहेत काय, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Inhuman killing of criminal benches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.