आरंभी परिसरात तीन हजार राेपट्यांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:12 AM2021-08-21T04:12:55+5:302021-08-21T04:12:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढला : जलभूमी, पाणी फाऊंडेशन तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने आरंभी (ता. नरखेड) येथील माेकळ्या जागेवर विविध जातीच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मेंढला : जलभूमी, पाणी फाऊंडेशन तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने आरंभी (ता. नरखेड) येथील माेकळ्या जागेवर विविध जातीच्या तीन हजार राेपट्यांची लागवड करण्यात आली. जलसंवर्धन व पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी या सर्व राेपट्यांच्या संगाेपन व संवर्धनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांसह नागरिकांनी स्वीकारली.
लागवड करण्यात आलेल्या राेपट्यांमध्ये सर्वाधिक २,१०० राेपटी कडूनिंबाची असून, आवळ्याची ५०, सीताफळ ५००, आंबा १००, सिसम ५०, जांभळाची २०० तर सामाजिक वनीकरण विभागाकडून बांबूच्या २०० रोपट्यांचा समावेश आहे. या वृक्षराेपण अभियानात आरंभी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७० विद्यार्थी, त्यांचे पालन व इतर नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले हाेते. विद्यार्थ्यांनी आपापल्या नावाची पाटी तयार करून राेपट्यांची लागवड केली व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, पाणी फाऊंडेशन समन्वयक हेमंत पिकलमुंडे, सरपंच नरेश गाेरे, तांत्रिक प्रशिक्षक रवींद्र पोमने यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते. परिसरातील बरडपवनी, बानोर (चंद्र), जामगाव व करंजाेली येथे वृक्षारोपण करण्यात आले.