अनधिकृत लेआउटधारकांवर कारवाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:31+5:302021-03-27T04:09:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरातील नगर परिषदेच्या मालकीची काही जागा शाळा व क्रीडांगणासाठी राखीव करण्यात आली हाेती. काहींनी ...

Initiation of action against unauthorized layout holders | अनधिकृत लेआउटधारकांवर कारवाईला सुरुवात

अनधिकृत लेआउटधारकांवर कारवाईला सुरुवात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शहरातील नगर परिषदेच्या मालकीची काही जागा शाळा व क्रीडांगणासाठी राखीव करण्यात आली हाेती. काहींनी त्या जागेवर लेआउट टाकून त्यातील भूखंड विकण्याचा घाट रचला. मात्र, हा प्रकार चव्हाट्यावर येताच पालिका प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले असून, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याकडे या जागेच्या दुय्यम प्रतीची मागणी केली आहे. शिवाय, दुय्यम निबंधकांना या जागेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार तूर्तास थांबविण्यासंदर्भात पत्र दिले आहे.

यासंदर्भात तुळशीराम काेठेकर व चंद्रशेखर भाेयर यांनी नगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली हाेती. प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्रकरणाची चाैकशी करीत सत्यता पडताळून बघितली. तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट हाेताच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे प्रमाणित दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. एवढेच नव्हेतर, या जागेचे खरेदी - विक्री व्यवहार थांबविण्याच्या लेखी सूचनाही दुय्यम निबंधकांना दिल्या आहेत.

या जागेवर अनधिकृत लेआउट तयार करून सर्वे नंबर-२ व सर्वे नंबर-२२४ असे नमूद केले आहे. ही जागा अकृषक मंजूर असल्याचेही नमूद आहे. त्यामुळे सदर अकृषक क्रमांकाची चाैकशी करण्यात यावी. नागरिकांची या अनधिकृत लेआउटमुळे फसवणूक हाेऊ नये म्हणून तहसीलदारांना याबाबत मालकी दस्तावेज अवलाेकनार्थ देण्यात आले आहेत. या दस्तऐवजांची चाैकशी करून जुने सर्वे नंबर व नवीन सर्वे नंबर याची जुळवणी व पडताळणी करून तलाठी नकाशा संबंधित अधिकार अभिलेख संपूर्ण फेरफार माहिती, संबंधित नकाशा लवकरात लवकर प्रमाणित करून देण्यात यावे. त्यामुळे नगरपालिकेची ही जागा सार्वजनिक कामासाठी वापरता येईल. अनधिकृत लेआउट विरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल, असे मुख्याधिकारी यांनी तहसीलदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच दुय्यम निबंधक रामटेक यांना सदर नगरपालिकेच्या जागेवर अनधिकृत लेआउटमधील भूखंडांच्या खरेदी - विक्रीचे सर्व व्यवहार व दस्त नाेंदणी थांबवावे; अन्यथा आपण आपल्या स्तरावर जबाबदार राहाल, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

...

याच जागेचा घाेळ

मंजूर विकास याेजना रामटेक अंतर्गत सर्वे क्रमांक-१६६ मधील जागा आरक्षण क्रमांक-२२ अन्वये प्राथमिक शाळा इमारत व खेळाचे मैदान म्हणून आरक्षित केले आहे. ही जागा ०.८८ हेक्टर आर असून, त्या जागेची महसूल विभागाच्या फेरफार पत्रकात नाेंदही आहे. याबाबत सर्वे नंबर-१६६/२ (खाते क्रमांक-१५५) मधील जागा पालिका प्रशासनाने संपादन केल्याने या जागेची पालिकेच्या दप्तरीही नाेंद आहे. पालिकेकडे या जागेचा जुना सातबारादेखील आहे. या जागेवर नगरपालिकेची विहीर व तारेचे कुंपण हाेते. सध्या त्या जागेवर साई नगरी जीत रिअलद्वारे सदर सार्वजनिक विहीर बुजवून तारेचे कुंपणही ताेडण्यात आले आहे.

Web Title: Initiation of action against unauthorized layout holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.