खापा येथे काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:32+5:302021-02-23T04:11:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : नागपूर जिल्ह्यात काेराेनाचे संक्रमण हळूहळू वाढत आहे. खापा (ता. सावनेर) शहरात काेराेनाचे पुन्हा संक्रमण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : नागपूर जिल्ह्यात काेराेनाचे संक्रमण हळूहळू वाढत आहे. खापा (ता. सावनेर) शहरात काेराेनाचे पुन्हा संक्रमण हाेऊ नये, यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या वतीने याेग्य खबरदारी घेतली जाणार असून, प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची अंमलबवणाजी सक्तीने केली जाईल. उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व प्रसंगी कठाेर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डेे यांनी दिली.
जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. मागील काही महिन्यापासून खापा शहर काेराेनामुक्त झाले आहे. शहरात पुन्हा काेराेनाचा शिरकाव हाेऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वताेपरी उपाययाेजना करून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. प्रत्येक व्यक्ती आणि वाहनचालकांना घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले असून, कुणीही गर्दीत जाऊ नये किंवा शहरातील दुकानांमध्ये अथवा आठवडी बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी केले आहे. या उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, प्रसंगी कठाेर कारवाई केेली जाणार असल्याचे मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डेे यांनी सांगितले.