शहरातील प्रभाग निहाय “सखोल स्वच्छता मोहिमस” प्रारंभ; १ फेब्रुवारीपर्यंत चालणार मोहिम
By मंगेश व्यवहारे | Published: January 24, 2024 03:43 PM2024-01-24T15:43:38+5:302024-01-24T15:44:23+5:30
रस्ते स्वच्छतेबरोबर नाले, चेंबर्सची स्वच्छता व रस्त्यावरील दुभाजकाची दुरूस्तीही
मंगेश व्यवहारे, नागपूर: स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या दिशेने पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील प्रभागनिहाय “सखोल स्वच्छता मोहिम”ला सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये “सखोल स्वच्छता मोहीम” राबविण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या १ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या मोहिमेत सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, फुटपाथ स्वच्छ करण्यात येणार आहे.
तसेच रस्त्यावर पाणी साचणार नाही याची खातरजमा करून फायरेक्स/डिस्लजिंग/वॉटर टँकर वापरून रस्ते साफ करण्यात येत आहे. मोहीमे दरम्यान निर्माण होणारा गाळ स्वतंत्रपणे गोळा करण्यात येत असून, रस्ते आणि पदपथावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात येत आहे, स्वच्छता मोहीमेत कोणताही अडथळा येणार नाही या दृष्टीने रस्ते व रस्त्या लगतच्या जागा अतिक्रमण मुक्त करण्यात येत आहे. नियमित पार्किंगसाठी रस्त्यावर विषम/सम तारखेची पार्किंग सुरू करण्यात येत आहे. सर्व प्रभागात सीवरेज/स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन (नाला)/वीज/टेलिफोन/ब्रॉडबँड चेंबर्स योग्य स्थितीत असल्याची खात्री करण्यात येत आहे. रस्ते दुभाजक दुरुस्त करण्यात येत आहेत आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यात येत आहे, तसेच जेथे शक्य असेल तेथे सुशोभीकरण करण्यात येत आहे. फूटपाथ आणि मध्यभागावरील कर्ब स्टोन पूर्णपणे स्वच्छ करण्यात येत आहे. पान व गुटखा खाऊन फुटपाथवर/रस्त्यांवर थुंकलेली जागा स्वच्छ करण्यात येत आहे.
मोहिमेत घ्यावा नागरीकांनी सहभाग
“सखोल स्वच्छता मोहिमेद्वारा सार्वजनिक आरोग्य सुधारेल, पर्यावरणाचे रक्षण होईल, नागरी भागामध्ये वाढत्या प्रदुषणाला आळा बसेल तसेच नागपूर, स्वच्छ सुंदर व स्वस्थ होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले आहे.
[2:58 PM, 1/24/2024] +91 77220 67858: मंगेश व्यवहारे
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद
नागपूर : भारतीय ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त’ २६ जानेवारी रोजी नागपूर शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश नागपूर महानगरपालिकेद्वारे जारी करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिशानिर्देशाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी यासंबंधी आदेश निर्गमित केले आहेत. शुक्रवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शहरात कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावर नागपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.