दीक्षाभूमी सज्ज! अनुयायांची वाढली गर्दी; राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेशातील अनुयायी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 10:25 PM2022-10-01T22:25:46+5:302022-10-01T22:26:13+5:30
Nagpur News शेकडो बौद्ध अनुयायी नागपुरात दाखल झाले असून दीक्षाभूमी गर्दीने फुलून गेली आहे.
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन सोहळा सुुरू होत आहे. यासाठी दीक्षाभूमी परिसर झाली सज्ज असून . परिसर निळ्या व पंचशील झेंड्यांनी फुलून गेला आहे. शेकडो बौद्ध अनुयायी नागपुरात दाखल झाले असून दीक्षाभूमी गर्दीने फुलून गेली आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजयादशमीच्या दिवशी ज्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली, त्या जागेवर नतमस्तक होऊन त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी वर्षभर ज्या सोहळ्याची देशविदेशातील बौद्ध बांधव वाट पाहतात. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दीक्षाभूमीवर साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा यंदाचा ६६ वा वर्धापन दिन सोहळा ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी दीक्षाभूमी परिसर सज्ज झाली. अतिशय श्रद्धेने महाराष्ट्रच नव्हे, तर देश-विदेशासह ग्रामीण भागातील आंबेडकर अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूर मुक्कामी येतात.
यंदा मुख्य समारंभाला चार दिवस असले तरी शनिवारपासूनच गर्दी वाढली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भिक्खू संघ दाखल झाला असून त्यांच्यासोबतच राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेशातील बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत मुक्कामी पोहोचले आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीकडून २ ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून धम्मदीक्षेला मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पुस्तके विक्रीसह विविध स्टॉल लागणे सुरू झाले आहे.
---------------