सिंधी भाषेच्या विकासासाठी युवकांनी घ्यावा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:21+5:302021-05-09T04:08:21+5:30
नागपूर : भाषा केवळ संवादाचे माध्यम नव्हे, तर ती संस्कृतिवाहक असते. भाषेच्या अंतासोबत संस्कृतीचाही अंत होतो. मातृभाषा उत्तम बोलणारा ...
नागपूर : भाषा केवळ संवादाचे माध्यम नव्हे, तर ती संस्कृतिवाहक असते. भाषेच्या अंतासोबत संस्कृतीचाही अंत होतो. मातृभाषा उत्तम बोलणारा व्यक्तीच इतर भाषा उत्तमपणे बोलू शकतो. याबाबत युवकांनी पुढाकार घ्यावा आणि सिंधी भाषेच्या विकासाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विनोद आसुदानी यांनी केले. भारतीय सिंधू सभेच्यावतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद (नवी दिल्ली) चे उपाध्यक्ष घनश्याम कुकरेजा, भारतीय सिंधू सभेचे महासचिव गोपाल खेमाणी, भारतीय सिंधू सभा सांस्कृतिक मंच (नागपूर) चे अध्यक्ष किशोर लालवानी, ज्येष्ठ रंगकर्मी विजय मदनानी, समाजसेवक राजू आहुजा यांनी विचार मांडली. यासोबतच सिंधी भाषा दिन व चेट्रीचंडच्या पर्वावर आयोजित भाषण स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. विजय मदनानी व किशोर लालवानी यांनी केले. प्रथम पुरस्कार हनी खिलवानी, द्वितीय पुरस्कार मानसी टहिलियानी, तृतीय पुरस्कार ईशा केवलरामानी यांना प्राप्त झाले. प्रोत्साहन पुरस्कार हर्षा अजमेरा, कृष्णा खिलवानी, खुशबू बजाज, सन्ना केवलरामानी, पायल मेंघानी, हिमांशी ठकुरानी, हेतल हिरानी, कृतिका दावडा, कृष्णा जेसवानी, टिना गुलानी यांना प्राप्त झाले. कार्यक्रमाचे संचालन महक आडवानी यांनी केले, तर नियोजन राजकुमार कोडवानी, दिलीप बीखानी, मोहनिश वाधवानी व जगदीश वंजानी यांनी केले.