जखमी झालेला ससाणा अखेर निसर्गमुक्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:34+5:302021-03-01T04:09:34+5:30
नागपूर : अतिशय वेगवान म्हणून ओळखला जाणारा ससाणा जीवघेण्या नायलाॅन मांजात अडकून गंभीर जखमी झाला हाेता. त्याचा पंख अर्धाअधिक ...
नागपूर : अतिशय वेगवान म्हणून ओळखला जाणारा ससाणा जीवघेण्या नायलाॅन मांजात अडकून गंभीर जखमी झाला हाेता. त्याचा पंख अर्धाअधिक चिरला हाेता. रक्ताने माखलेला, जखमांनी तडफडणाऱ्या या पक्ष्याला ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आले. यशस्वी शस्रक्रिया व दाेन महिले देखरेख केल्यानंतर नुकतेच या वेगवान पक्ष्याला त्याच्या अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले.
भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेचे नितीन देसाई यांच्या घरी हा ससाणा मांजामध्ये अडकलेला दिसून आला हाेता. मांजामुळे त्याचा पंख चिरला गेला हाेता. माहिती मिळताच ट्रान्झिट सेंटरचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याला अत्यंत शिताफीने अलगद मांजाच्या गुंत्यातून सुखरूप साेडविण्यात आले; पण पंखाला माेठी जखम झाली हाेती. त्याला केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिलाल, डाॅ. मयूर काटे व इतर चमूने त्याच्यावर शस्रक्रिया केली. तब्बल दोन महिन्याच्या उपचारानंतर तो पक्षी बरा झाला. तो व्यवस्थित उडू शकतो की नाही, हवेत शिकार करू शकतो काय याची खात्री पटल्यानंतर त्या पक्ष्याची पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची हमी दिली व त्यानंतर त्याला त्याच्या मूळ अधिवासात मुक्त करण्यात आले. त्याला मुक्त केल्यानंतर अतिवेगाने हा पक्षी आपल्या अधिवासात परतला.