अन्याय होऊ देणार नाही पण आरोग्य सर्वोच्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:12 AM2021-09-09T04:12:02+5:302021-09-09T04:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाएकी कोणत्याही घटकावर अन्याय होईल, असे निर्णय घेतले जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विमला ...

Injustice will not be allowed but health is paramount | अन्याय होऊ देणार नाही पण आरोग्य सर्वोच्च

अन्याय होऊ देणार नाही पण आरोग्य सर्वोच्च

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकाएकी कोणत्याही घटकावर अन्याय होईल, असे निर्णय घेतले जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विमला आर. यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना दिली. मात्र आरोग्य सर्वोच्च असून त्यादृष्टीने व्यापारी व दुकानदार वर्गानेही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बुधवारी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी व्यायावेळी सांगितले की, राज्य शासन देखील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. त्यामुळे या संदर्भात एकत्रित काही निर्णय होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. मात्र यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या निर्णयावर नागपूर शहरातील व ग्रामीण भागातील निर्बंध अवलंबून असतील. यामध्ये स्थानिक स्तरावरील आवश्यकता, उपाययोजना व वस्तुस्थिती वरिष्ठांना वेळोवेळी कळविल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Injustice will not be allowed but health is paramount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.