पतीची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:31+5:302021-04-01T04:07:31+5:30
सिद्धार्थ नाना टेंभुर्णे असे आरोपीचे नाव असून, तो पाचपावली येथील रहिवासी आहे. मृताचे नाव सुनंदा होते. आरोपीने चारित्र्यावरील संशयामुळे ...
सिद्धार्थ नाना टेंभुर्णे असे आरोपीचे नाव असून, तो पाचपावली येथील रहिवासी आहे. मृताचे नाव सुनंदा होते. आरोपीने चारित्र्यावरील संशयामुळे ३० सप्टेंबर २००६ रोजी सुनंदाचा खून केला, अशी पोलीस तक्रार होती. १४ ऑगस्ट २००८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपीच्या वतीने ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली. प्रकरणातील सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले असून कुणीही सरकारचे समर्थन केले नाही, ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने यासह विविध मुद्दे लक्षात घेता, सरकार पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्याचा निष्कर्ष नोंदवून आरोपीला निर्दोष सोडले.