लॉकडाऊनच्या काळात नाविन्यपूर्ण अध्ययन व अध्यापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:47+5:302021-06-26T04:07:47+5:30
भिवापूर: शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व डीआयईटी नागपूर यांच्यावतीने ‘सर्वोत्तम सराव कार्यशाळा’ गुरुवारी भिवापूर येथे संपन्न झाली. यात उमरेड, ...
भिवापूर: शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व डीआयईटी नागपूर यांच्यावतीने ‘सर्वोत्तम सराव कार्यशाळा’ गुरुवारी भिवापूर येथे संपन्न झाली. यात उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांनी शाळेत राबविलेले नाविन्यपूर्ण अध्ययन व अध्यापन पध्दतीचे सादरीकरण केले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेला प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रार्चाया हर्षलता बुराडे, प्रकल्प संचालक रवींद्र इमतकर, प्राचार्य डॉ.जोबी जॉर्ज, गट विकास अधिकारी माणिक हिमाने, सहायक गट विकास अधिकारी रोशनकुमार दुबे, गट शिक्षणाधिकारी विजय कोकोडे, मनोज पाटील, शारदा किनारकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भिवापूर तालुक्यातून अल्का फुलझेले, ओमप्रकाश कांबळे, उमरेड तालुक्यातून नम्रता गभने तर कुही तालुक्यातून माधूरी सेलोकर, विजय घोरपडे या पाच जिल्हा परिषद शिक्षकांनी अध्ययन व अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पध्दतीचे सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांनी सर्वोत्तम सराव कार्यशाळेचे महत्व विषद करत, शिक्षकांनी सादर केलेल्या अध्ययन व अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण सादरीकरणाचे कौतूक केले. लॉकडाऊन मध्ये शाळा बंद असल्या तरी अध्ययन व अध्यापन सुरूच आहे. त्यासाठी हे नाविन्यपूर्ण उपक्रम महत्वाचे ठरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. संचालन संजय खोब्रागडे यांनी तर आभार गट शिक्षणाधिकारी विजय कोकोडे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता मिलिंद मेश्राम, हरिश्चंद्र दहाघने, गोविंदा भोंडे, आनंद गिरडकर, राजेश शेटे, विजय चिलबुले आदींनी परिश्रम घेतले.
===Photopath===
250621\img-20210624-wa0097.jpg
===Caption===
व्यासपिठावर उपस्थित मान्यवर