बोर्डाकडून अखेर चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:52+5:302020-12-15T04:25:52+5:30
नागपूर : नागपूर बोर्डात स्कूल इंडेक्स नंबरसाठी १० हजार रुपयाची लाच मागितली जात असल्यासंदर्भातील वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. ...
नागपूर : नागपूर बोर्डात स्कूल इंडेक्स नंबरसाठी १० हजार रुपयाची लाच मागितली जात असल्यासंदर्भातील वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी पत्र देऊन नागपूर जिल्ह्यातील कापसी खुर्द येथील श्रीमती विमलादेवी शंकरलाल गांधी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाला कार्यालयात बोलाविले. त्यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आली व प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, काही शाळांनी स्कूल इंडेक्स नंबरसाठी अधिकारी व कर्मचाऱ्याला १० हजार रुपये दिले. लाच न देणाऱ्या शाळांचे प्रस्ताव पेंडिंग ठेवण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रविष्ट करण्यासाठी इंडेक्स नंबर आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत सहभागी होण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी सातत्याने बोर्डात चकरा मारतात. लोकमतच्या वृत्तानंतर बोर्डाने शाळेच्या मुख्याध्यापकाला बोलावून चौकशी सुरू केली आहे.