खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:34+5:302021-07-03T04:07:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्यादरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची उद्योगमंत्री देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेवसिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची एकसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितील एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान, महजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.