रेल्वे अधिकाºयांनी केले खाद्यपदार्थांचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:28 AM2017-08-27T01:28:44+5:302017-08-27T01:29:06+5:30
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बेस किचन, जनाहार, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे निरीक्षण करून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बेस किचन, जनाहार, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे निरीक्षण करून प्रवाशांच्या स्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३१ आॅगस्टपर्यंत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र आणि विभागातील अधिकाºयांनी रेल्वेस्थानक परिसरातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, बेस किचन, जनाहार कँटीनची पाहणी केली. तेथील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची बारकाईने तपासणी करण्यात आली. याशिवाय रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमधील सफाई, खाद्यपदार्थांचे दर आदींची पाहणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर प्रवाशांना भोजनाचा पुरवठा करणाºया कर्मचाºयांच्या राहणीमानाची तपासणी करण्यात आली. यावेळी किचनमधील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रवाशांकडूनही स्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.