नागपुरात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी चाचपणी !

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 11, 2023 08:08 PM2023-03-11T20:08:11+5:302023-03-11T20:08:40+5:30

Nagpur News केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नवी दिल्लीतील इंजिनिअर्स इंडिया लि.च्या (ईआयएल) दोन सदस्यीय चमूने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी एमआयडीसीच्या नवीन बुटीबोरी औद्योगिक परिसराची पाहणी केली.

Inspection for petrochemical complex in Nagpur! | नागपुरात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी चाचपणी !

नागपुरात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी चाचपणी !

googlenewsNext

नागपूर : केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नवी दिल्लीतील इंजिनिअर्स इंडिया लि.च्या (ईआयएल) दोन सदस्यीय चमूने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी एमआयडीसीच्या नवीन बुटीबोरी औद्योगिक परिसराची पाहणी केली. सर्वेक्षणाचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल चार महिन्यांत येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स होणार वा नाही, यावर निर्णय होणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारी वा खासगी यांपैकी कोणती कंपनी पुढाकार घेते, ही बाबही प्रकल्पासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

मिहान वा नागपूर जिल्ह्यांतील औद्योगिक परिसरात रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स एकत्रित आणण्यासाठी ‘वेद’चे प्रदीप माहेश्वरी यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी ‘ईआयएल’च्या दोन अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणाने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास २५०० एकर जागा लागणार आहे.

हिवाळी अधिवेशनात चर्चा

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या मुद्द्यावर नागपुरात हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांच्याशी वेदच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली होती. या प्रकल्पासाठी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ‘ईआयएल’चे मुख्य महाव्यवस्थापक अनिल कुमार आणि वरिष्ठ व्यवस्थापक विनित बक्षी या दोन अधिकाऱ्यांचा चमू सर्वेक्षणासाठी आला.

 

रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स एकत्रित व्हावे

विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स येऊन चालणार नाही; तर रिफायनरीसोबत पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पाची उभारणी व्हायला हवी. याकरिता जवाहरलाल नेहरू पोर्टवरून  तीन वेगवेगळ्या पाइपलाइनच्या माध्यमातून इथेन, नैसर्गिक गॅस आणि नाफ्ता प्रकल्पात आला पाहिजे. रिफायनरीतून केमिकलची मोठी रेंज आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पात कमी रेंज मिळते.

- प्रदीप माहेश्वरी, नैसर्गिक संशाेधन तज्ज्ञ

Web Title: Inspection for petrochemical complex in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.