मनपा आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 09:04 PM2019-09-05T21:04:55+5:302019-09-05T21:06:14+5:30

गुरुवारी आयुक्त अभिजित बांगर यांनी फुटाळा तलाव आणि अन्य ठिकाणी भेटी देऊन या स्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.

Inspection of immersion sites by Municipal Commissioner | मनपा आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी

मनपा आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी

Next
ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवात घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेने कृत्रिम तळे, निर्माल्य कलश व अन्य व्यवस्था केली आहे. गुरुवारी आयुक्तअभिजित बांगर यांनी फुटाळा तलाव आणि अन्य ठिकाणी भेटी देऊन या स्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावातच करावे असे विसर्जन स्थळी भक्तांना आवाहन आणि विनंती करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते.
फुटाळा तलाव येथील भेटीत बागंर यांनी अधिकाऱ्यांकडून विसर्जन व्यवस्थेची माहिती घेतली. तलाव परिसरातील वायुसेना नगरच्या भागात भाविकांना विनंती करण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांशी त्यांनी चर्चा केली. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ वायुसेना नगर भागात ठेवण्यात आलेल्या कृत्रिम तलावात ३ सप्टेंबरला ३२० आणि ४ सप्टेंबरला २२० गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नागरिक स्वत: यासाठी पुढाकार घेत असून तलाव स्वच्छ राहावे, ही प्रत्येकाची भावना असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले. बांगर यांनी सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले आणि कृत्रिम तलावात गणेश विसर्जन आणि निर्माल्य कुंडातच निर्माल्य दान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Inspection of immersion sites by Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.