समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवरच आरटीओची तपासणी, २४ बाय ७ पथक कार्यरत

By सुमेध वाघमार | Published: July 3, 2023 07:34 PM2023-07-03T19:34:51+5:302023-07-03T19:34:58+5:30

बसमधील आप्तकालिन डोअर सुस्थीत असेल तरच परवानगी.

Inspection of RTO at entry point of Samriddhi Highway, 24 by 7 team working | समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवरच आरटीओची तपासणी, २४ बाय ७ पथक कार्यरत

समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवरच आरटीओची तपासणी, २४ बाय ७ पथक कार्यरत

googlenewsNext

सुमेध वाघमारे 
नागपूर :
समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताला आरटीओने गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या एन्ट्री पॉर्इंटवरच आता २४ बाय ७ वायु पथक कार्यरत के ले आहे. विशेषत: ट्रॅव्हल बसची कागदपत्र, टायर आणि आप्तकालिन स्थितीत बाहेर पडणाºया मार्गाची तपासणी केली जात आहे. हे सर्व सुस्थीत असेल तरच पुढे रहदारीसाठी परवानगी दिली जात आहे.

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८०किरकोळ स्वरुपातील अपघात आहेत. शनिवार झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपोळून मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणाच खळबळून जागी झाली. या महामार्गावर आतापर्यंत ९५ जणांचे जीव गेले आहेत.

अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सुरूवातीपासून उपाययोजना के ल्या जात असल्यातरी दरम्यानच्या काळात त्यात शिथीलता आली होती. परंतु या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या ‘एन्ट्री पॉर्इंट’वरच प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घेतला आहे. त्यासाठी २४ बाय ७ साठी ३ पथक नेमण्यात आले आहे. मागील २४ तासांत या पथकाने ७०वर ट्रॅव्हल बसची तपासणी केली आहे.

Web Title: Inspection of RTO at entry point of Samriddhi Highway, 24 by 7 team working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.