ताजबाग सौंदर्यीकरणाच्या कामाचे विभागीय आयुक्तांकडून निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:12 AM2021-08-13T04:12:55+5:302021-08-13T04:12:55+5:30
नागपूर : सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पानुसार काम होत आहे अथवा नाही, याची पहाणी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी ताजबागला भेट ...
नागपूर : सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पानुसार काम होत आहे अथवा नाही, याची पहाणी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी ताजबागला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी नासुप्रचे चेअरमन मनोज सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, प्रशांत भंडारकर यांच्यासह ताजबाग ट्रस्टचे चेअरमन प्यारे खान, सचिव ताज अहमद राजा आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी या भेटीदरम्यान सौंदर्यीकरण योजनेतील कामातील अनियमितपणाचे निरीक्षण केले. विकास कामातील अनियमितता लवकरच दूर करण्याचे आश्वासन दिले. आगामी ९९ व्या वार्षिक ऊर्ससंदर्भातही यावेळी चर्चा केेली.
ताजबाग सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पामध्ये दिसत असलेल्या अडचणीसंदर्भात अलीकडेच ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब निदर्शनास आणली होती, नंतर प्रशासकीय स्तरावरून ही हालचाल झाली. कोरोना काळातील निर्बंध लक्षात घेऊनच वार्षिक ऊर्स पार पाडला जाईल, असे ट्रस्टचे सचिव ताज अहमद राजा यांनी सांगितले.