‘आरडीएसओ’ने केले मेट्रोच्या कामांचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:21 AM2017-09-08T01:21:19+5:302017-09-08T01:21:37+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते न्यू एअरपोर्ट स्टेशन यादरम्यान ५.०८ कि़मी. अंतरापर्यंत ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन व मानक संघटना) अधिकाºयांनी गुरुवारी सकाळी कामांचे निरीक्षण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते न्यू एअरपोर्ट स्टेशन यादरम्यान ५.०८ कि़मी. अंतरापर्यंत ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन व मानक संघटना) अधिकाºयांनी गुरुवारी सकाळी कामांचे निरीक्षण केले.
‘आरडीएसओ’चे कार्यकारी संचालक राजेश कुमार नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांच्या प्राथमिक निरीक्षणासाठी मिहान डेपोला पोहोचले. महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार अग्रवाल आणि मेट्रो रेल्वेचे वरिष्ठ अभियंता आणि अधिकाºयांसोबत त्यांनी कामांचे निरीक्षण केले. राजेश कुमार यांनी ‘रेल्वे ट्रॉलीत’ बसून पाहणी केली.
अधिकाºयांनी आपात स्थितीत करण्यात येणाºया उपायांवर प्रात्यक्षिक सादर केले. ओएचई आणि टीएसएसचे निरीक्षण केल्यानंतर अधिकाºयांसोबत ट्रॉलीमध्ये बसून रेल्वे रुळाची तपासणी करीत खापरी स्टेशनपर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी निरीक्षण केले. निरीक्षणानंतर त्यांनी कामावर समाधान व्यक्त केले. मेट्रो रेल्वेच्या प्राथमिक सेक्शनच्या कार्याची प्रशंसा केली.
सध्या आरएसडीओच्या एकाच अधिकाºयाने निरीक्षण केले. पण नंतर अधिकाºयांची चमू मेट्रो रेल्वेच्या कामांच्या निरीक्षणासाठी नागपुरात येणार आहे. या अधिकाºयांच्या उपस्थितीत प्रत्येक बोगीमध्ये प्रवाशांच्या वजनाएवढे रेतीचे पोते भरून ‘ट्रायन रन’ला सुरुवात करतील. ट्रायन रन तब्बल आठवडाभर चालणार आहे.
तत्पूर्वी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरडीएसओच्या निरीक्षणाची घोषणा केली होती. त्यानुसार निरीक्षणाची तयारी पूर्ण केली होती. दीक्षित यांनी स्वत: डेपोचा दौरा केला होता आणि कामांची बारकाईने पाहणी करून समाधान व्यक्त केले होते.