औद्योगिक क्षेत्रात जलशुद्धकरण संयंत्र तत्काळ लावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:44+5:302021-02-12T04:08:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारखान्यापासून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे अंबाझरी तलाव प्रदूषित होत असल्याच्या तक्रारींची जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ...

Install water purification plant in industrial area immediately () | औद्योगिक क्षेत्रात जलशुद्धकरण संयंत्र तत्काळ लावा ()

औद्योगिक क्षेत्रात जलशुद्धकरण संयंत्र तत्काळ लावा ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कारखान्यापासून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे अंबाझरी तलाव प्रदूषित होत असल्याच्या तक्रारींची जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गंभीर दखल घेत वाडी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्र तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंगणा औद्योगिक क्षेत्रासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अंबाझरी तलावाच्या पाण्याचा वापर होत असून तलावातील पाणी प्रदूषित करू नका, असे निर्देशही त्यांनी दिले.

बचत भवन सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिंगणा, बुटीबोरी, भिवापूर, कळमेश्वर येथील उद्योजक तसेच विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन, बुटीबोरी व हिंगणा मॅनिफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी तसेच लघू उद्योग कोशिया संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वाडी तसेच हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी अंबाझरी तलावात सोडल्या जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण व दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन अंबाझरी तलावजवळील नाल्यावर एसटीपीयंत्र बसविण्यासंदर्भात वाडी नगरपंचायतीने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देतानाच महानगरपालिकेतर्फे एसटीपी बसविण्याचे काम सुरू केले असून, हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी बी.ए. यादव, कोशियाचे झुल्पेश शहा, सचिन जैन, प्रवीण अंबासेलकर, आर. एस. तिडके, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मिहानचे सल्लागार ए. पी. चहांदे, एस. के. चटर्जी, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, महावितरणचे एन. एल. आमधरे, ए. एस. परांजपे, व्ही.आर. कुलकर्णी, बुटीबोरी मॅनिफॅक्चरिंगचे प्रशांत मेश्राम उपस्थित होते.

बॉक्स

खुल्या जागांवर टाकला जतोय कचरा

हिंगणा औद्योगिक क्षेत्रात खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात आहे. दररोज २० टन कचरा गोळा करण्यासाठी तसेच कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी जिल्हा परिषदेने जागेचा शोध घेऊन विलगीकरणाचे काम सुरू करावे. तत्पूर्वी औद्योगिक विकास मंडळाने तत्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले. एमआयडीसीमधून वाडीकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेचे अधिग्रहण करून बायपास तयार करण्याबाबतही सांगण्यात आले.

बॉक्स

मूलभूत सुविधांची मागणी

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील ड्रेनेज लाइन परिसराची स्वच्छता, उद्योजकांना दैनंदिन आवश्यक सुविधा तसेच उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्यात. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय सुरू होत असून त्याच धर्तीवर हिंगणा औद्योगिक क्षेत्रातही कामगारांना आरोग्य सुविधा मिळण्यासंदर्भात उद्योगजकांनी सूचना केली.

Web Title: Install water purification plant in industrial area immediately ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.