पालकांना साहित्याच्या खरेदीसाठी संस्थांनी सक्ती करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:00 PM2020-06-03T22:00:02+5:302020-06-03T22:01:06+5:30
नवीन शैक्षणिक सत्रात खासगी संस्थांकडून पालकांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे पालकांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशात संस्थांनी पालकांना साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी जय जवान जय किसान व जागृत पालक समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन शैक्षणिक सत्रात खासगी संस्थांकडून पालकांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे पालकांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशात संस्थांनी पालकांना साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी जय जवान जय किसान व जागृत पालक समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली. संघटनेतर्फे त्यांना दिलेल्या निवेदनात यंदा फी ५० टक्के कमी करावी, गेल्या सत्रातील परीक्षा फी, मासिक फी, स्कूल बसचे पैसे पालकांकडून मागू नये. विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण घेण्याची सक्ती करू नये. यावेळी पटोले यांनी शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे यांना तात्काळ बोलावून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समन्वयक विजयकुमार शिंदे, सचिव अरुण वनकर, जागृत पालक समितीचे नितीन नायडू, स्मिता ताजने, संजय शर्मा, फुलचंद नागले, संतोष वैद्य, मंगला गजभिये, प्रशांत नाईक, योगेश मानके आदी उपस्थित होते.