सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने जाहीर केलेल्या सूचना मागे घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:09 AM2020-12-22T04:09:31+5:302020-12-22T04:09:31+5:30

काटोल : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांनी मॉडर्न मेडिसीन प्रॅक्टिससंदर्भात नुकत्याच जाहीर केलेल्या सूचना मागे घ्याव्यात, अशी मागणी ...

The instructions issued by the Central Council of Indian Medicine should be withdrawn | सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने जाहीर केलेल्या सूचना मागे घ्याव्यात

सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने जाहीर केलेल्या सूचना मागे घ्याव्यात

Next

काटोल : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांनी मॉडर्न मेडिसीन प्रॅक्टिससंदर्भात नुकत्याच जाहीर केलेल्या सूचना मागे घ्याव्यात, अशी मागणी करणारे आयएमए काटोलच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला सादर केले.‘सीसीआयएम’ने मॉडर्न मेडिसीनमधील ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याविषयी आयुर्वेदिक पदवीधारकांना केलेल्या सूचना मागे घ्याव्यात किंवा या निर्णयातून भविष्यात शस्त्रक्रिया झाल्यास त्यापासून उद्भवणाऱ्या अडचणीची जबाबदारी स्वीकारावी. सर्वसामान्य जनता व रुग्ण यांना मॉडर्न मेडिसीनमधील एम.डी. किंवा एम.एस. व आयुर्वेदातून झालेले एम.डी किंवा एम.एस. यातील फरक कळण्याकरिता आयुर्वेदिक व शल्यचिकित्सक असे लिहिण्यास भाग पाडावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ. सचिन चिंचे, डॉ. अमित बंड, डॉ. संजय टावरी, डॉ. सचिन घाटे, डॉ. दिलीप चांडक, डॉ. राजू काळवीट, डॉ. अमोल करांगळे, डॉ. अमोल अंबाडकर, डॉ. किशोर ढोबळे, डॉ. सुनीता सावरकर, डॉ. प्राजक्ता बंड आदींचा समावेश होता.

Web Title: The instructions issued by the Central Council of Indian Medicine should be withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.