संघ मुख्यालयाच्या निर्देशावरून सहगल यांच्याबाबत अपमानजनक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:33 AM2019-01-09T01:33:35+5:302019-01-09T01:35:46+5:30

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करून नंतर त्यांना प्रतिबंध घालण्यात आल्याच्या लांच्छनास्पद भूमिकेविरोधात सर्व साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे.

The insulting role of Sehgal on the direction of the RSS headquarter | संघ मुख्यालयाच्या निर्देशावरून सहगल यांच्याबाबत अपमानजनक भूमिका

संघ मुख्यालयाच्या निर्देशावरून सहगल यांच्याबाबत अपमानजनक भूमिका

Next
ठळक मुद्देआमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा आरोपसंमेलनावर बहिष्कार टाकण्याचे पीरिपाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करून नंतर त्यांना प्रतिबंध घालण्यात आल्याच्या लांच्छनास्पद भूमिकेविरोधात सर्व साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी व संमेलन आयोजकांनी संघ मुख्यालयाच्या निर्देशावरून सहगल यांच्याबाबत अशी अपमानजनक भूमिका घेतल्याचा आरोप प्रा. कवाडे यांनी केला. महिलांना अपमानित करणे ही मनुवादी परंपरा असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यविरोधी असलेल्या ब्राह्मणवादी साहित्य संमेलनावर जनतेनेही बहिष्कार घालावा, असे आवाहनही त्यांनी केले. पक्षातर्फे आम्ही या प्रकाराचा निषेध करीत असल्याची भूमिका पत्रकाद्वारे त्यांनी मांडली.

Web Title: The insulting role of Sehgal on the direction of the RSS headquarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.