नागपुरातील १७ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:52 AM2020-11-24T00:52:09+5:302020-11-24T00:55:13+5:30
Insurance of Rs 50 lakh sanctioned to 17 Zilla Parishad employees , nagpur news कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या राज्यातील १७ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ५० लाखाच्या विमा कवचाची रक्कम राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मंजूर केली आहे. यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या राज्यातील १७ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ५० लाखाच्या विमा कवचाची रक्कम राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मंजूर केली आहे. यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या १७ कर्मचाऱ्यांमध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या ज्या दोन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यात सुनील शेंडे, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, सावनेर व दिलीप कुहिटे, विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती, नागपूर यांचा समावेश आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या जवळपास १२ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात सहायक शिक्षकांची संख्या मोठी आहे. पंचायत विभागाकडील दोन विस्तार अधिकारी यांचा मृत्यू झाला, यात पंचायत विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना विमा कवचाचा लाभ मिळवून न्याय दिला व तत्परता दाखवली. त्याच धर्तीवर शिक्षण विभागानेसुद्धा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे पाठविण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.