लोकमत कॅम्पस क्लबतर्फे आंतरशालेय एकल गीत गायन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:40+5:302021-08-28T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने आंतरशालेय एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबच्यावतीने आंतरशालेय एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या ए व बी अशा दोन गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी मेजर हेमंत जकाते (एम.एच.जे.) विद्यानिकेतन ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे सहकार्य लाभले असून, व्हेन्यू पार्टनर म्हणून एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज या स्पर्धेत सहभागी आहेत.
वर्ग ३ ते वर्ग ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ए गट तर वर्ग ८ ते वर्ग १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ब गट अशा दोन गटात ही स्पर्धा पार पडेल. हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही एका गीतासह एका शाळेतून ए व बी गटातून प्रत्येकी एक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाला संबंधित गीताचा अंतरा व मुखडा ९० सेकंदाच्या व्हिडिओसह २८ ऑगस्टपर्यंत पाठवायचा आहे. हा व्हिडिओ ९८२२४०६५६२ किंवा ९९२२९१५०३५ या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. या ऑडिशन राऊंडमधून दोन्ही गटात २० सर्वोत्तम स्पर्धकांची निवड केली जाणार असून, या अंतिम स्पर्धकांची अंतिम फेरी १ सप्टेंबर रोजी नारायणी हॉल, एम.के.एच. संचेती पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान लाईव्ह परफॉर्मन्सद्वारे पार पडेल. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे व शाळांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.................