आंतरराष्ट्रीय फॅक्ट चेकिंग दिन; निवडणुकीच्या प्रचारात फेक न्यूजचा भडीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:33 AM2019-04-02T11:33:01+5:302019-04-02T11:35:05+5:30
निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावून प्रचारादरम्यान होणाऱ्या चुकीच्या बाबींवर आळा घातला आहे. पण सोशल मीडियाला आचारसंहिता लागू पडत नाही. त्याचाच फायदा राजकीय पक्षाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते घेत आहेत.
अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावून प्रचारादरम्यान होणाऱ्या चुकीच्या बाबींवर आळा घातला आहे. पण सोशल मीडियाला आचारसंहिता लागू पडत नाही. त्याचाच फायदा राजकीय पक्षाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते घेत आहेत. फेक न्यूजच्या माध्यमातून अॅन्टी प्रचार करण्यात येत आहे. यातून नेत्यांच्या प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे.
याचे नुकतेच उदाहरण पाहायचे झालेत तर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणात पदार्पण केल्यानंतर सोशल मीडियावर एक संदेश आणि मातोंडकर यांचा फोटो व्हायरल झाला. ज्यात लिहिले होते की त्यांनी पाकिस्तानच्या मोहसीन अख्तर मीर यांच्यासोबत निकाह केला. पण उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल माहिती गूगलवर शोधल्यास असे कळेल की त्यांचे पती हे काश्मीरचे रहिवासी आहेत, पाकिस्तानचे नाही. तसेच, प्रियांका गांधी वाड्रा यांच्या एका रॅलीमधील फोटो व्हायरल झाला. ज्यात त्यांच्या गळ्यात क्रॉस दिसला, विविध मजकुरासह हा फोटो शेअर केल्या जात होता. पण काही विश्वसनीय फॅक्ट-चेकरनी तोच फोटो पडताळल्यास असे आढळले की त्यांच्या गळ्यात एक पांढऱ्या रंगाचं पेन्डंट होते. फोटो शॉपवरून त्यांच्या गळ्यात क्रॉस दाखविण्यात आला. फक्त फोटो-शॉपवरून फोटोच शेअर केले जातात असे नाही, तर व्हिडीओदेखील विविध मजकुरांसोबत फेसबुक, टिष्ट्वटरवर बघायला मिळतात. नुकताच गंगा सफाई मंत्री उमा भारती यांचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विनाश पुरुष असा उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ २ मिनिटे ७ सेकंदाचा असून, त्या एका पत्रकार परिषदेत बोलताना दिसतात. या व्हिडीओला फॅक्ट चेक केले. तो १७ एप्रिल २०१४ रोजीचा असल्याचे समोर आले. उमा भारती यांनी असे वक्तव्य केले ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा भाजपसोबत त्यांचे संबंध चांगले नव्हते आणि त्या स्वत:चा एक राजकीय पक्ष भारतीय जनशक्ती पार्टी सुरू करण्याच्या विचारात होत्या. या सगळ्या दिशाभूल करणाºया बातम्यांना आळा घालू शकत नाही; पण मग सामान्य माणूस म्हणून त्यातील तथ्य शोधणे गरजेचे आहे. त्यासाठीसुद्धा तंत्रज्ञान आहे. सोशल मीडियावर राहणाऱ्यांनी अशा फेक न्यूजची फॅक्ट जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सामान्य जणांना निवडणुकीच्या काळात पारदर्शी निर्णय घेता येईल.
लोकशाहीमध्ये नागरिकांनी मतदान करण्याचा हक्क बजावण्यासह विविध राजकीय पक्ष व नेत्यांच्या प्रचाराचे टीकात्मक दृष्टीने निरीक्षण करावे. वर्तमान काळात सोशल मीडियावर फेक न्यूजचा महापूर वाहत आहे. यामध्ये चुकीच्या पोस्ट, वैयक्तिक आरोप, असामान्य दावे, धक्कादायक फोटो किंवा वक्तव्य, शासकीय साधनांचा वापर करून जात, धर्म, वर्ण, लिंग, भाषा आदींच्या नावाने लोकांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा सर्व पोस्टबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे.
- डॉ. मोईज मनन हक, सदस्य मीडिया सर्टिफिकेशन अॅन्ड मॉनिटरिंग कमिटी, निवडणूक आयोग, नागपूर व रामटेक लोकसभा
सध्या ‘मिसइन्फॉर्मेशन’च्या युद्घात सोशल मीडियाचा वापर करणाºया सामान्य नागरिकांना चुकीच्या माहितीद्वारे दिशाभूल करणारे लोक निवडणुकीच्या काळातही सज्ज झाले आहेत. हे लोक चुकीच्या पद्धतीने तुमचे मत प्रभावित करण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहून ‘फॅक्ट चेकिंग वेबसाईट्स’ आणि ‘फॅक्ट चेकर्स’द्वारे मांडल्या जाणाºया सत्यतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण फॅक्ट चेकर्सद्वारे तळापर्यंत जाऊन बातमी किंवा माहितीची सत्यता पडताळली जाते.
- जेन्सी जेकब, मॅनेजिंग एडिटर, बूम (फॅक्ट चेकिंग वेबसाईट)
तुम्ही काय करू शकता
कोणतीही बातमी विविध सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करण्यापूर्वी ती तपासून बघा. ती तपासायला तुम्ही एक साधा गूगल सर्च करून ती बातमी अजून कुठे प्रकाशित झाली आहे का हे बघू शकता. नाही तर, देशातील काही ‘फॅक्ट-चेकिंगह्ण वेबसाईटवर त्या सापडतायत का ते बघू शकता.
एक साधा गूगल रिव्हर्स इमेज सर्च देखील तुम्ही तुमच्या लॅपटॉप आणि मोबाईल फोनवर सहज करू शकता.