पुढील महिन्यात नागपुरातून सुरू होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 07:10 AM2021-11-25T07:10:00+5:302021-11-25T07:10:02+5:30

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी आता एअर अरेबियाचे जी ९-४१५, ४१६ नागपूर-शारजाह-नागपूर विमान ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

International flights will start from Nagpur next month | पुढील महिन्यात नागपुरातून सुरू होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुढील महिन्यात नागपुरातून सुरू होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

googlenewsNext
ठळक मुद्देएअर अरेबियाचे ५ ते २३ डिसेंबरपर्यंत उड्डाणाचे संचालन

वसीम कुरैशी

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी आता एअर अरेबियाचे जी ९-४१५, ४१६ नागपूर-शारजाह-नागपूर विमान ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. एअर अरेबियाने नागपूर विमानतळाला सध्या एक महिन्याचे शेड्युल दिले आहे. कंपनी ५ ते २९ डिसेंबरपर्यंत १२ उड्डाणांचे संचालन करणार आहे. त्यानंतर कंपनी जानेवारी २०२२ पासून वेगळे शेड्युल तयार करणार आहे.

कंपनी कोरोनासंदर्भात अजूनही सजग आहे. एअर अरेबिया नागपूर ते शारजाहदरम्यान एअर बस-३२० विमानाने उड्डाणाचे संचालन करते. त्याची प्रवासी क्षमता १६० सीटची आहे. या विमानामध्ये प्रवाशांसह कार्गो सेवा उपलब्ध आहे. या विमानातून विदर्भातून भाज्या यूएईला पाठविल्या जातात. ही सेवा १५ वर्षांपासून नागपूर ते संयुक्त अरब अमिरातचे शहर शारजाहकरिता संचालित होत आहे. पहिल्यांदाच पाऊणे दोन वर्षांसाठी उड्डाणे बंद राहिली. हे उड्डाण नेहमीच फुल्ल असते. कमी तिकीट दर हे त्याचे मुख्य कारण आहे. नागपुरातून रवाना झाल्यानंतर केवळ ३.३० तासांत शाहजाहला पोहोचते. याशिवाय विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील लोक नागपुरात येऊन शारजाहला प्रवास करतात. अनेक भारतीय यूएईमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

यूडीएफ मिळणार

लॉकडाऊनमध्ये नागपुरातून उड्डाणे बंद राहिल्यामुळे विमानतळ व्यवस्थापनाला जवळपास ५० लाख रुपयांचा यूजर डेव्हलपमेंट फीचे (यूडीएफ) नुकसान झाले आहे. आता घरगुती उड्डाणांसह आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यानंतर मिहान इंडिया लिमिटेडच्या महसुलात वाढ होईल.

Web Title: International flights will start from Nagpur next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान