आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार दिगांबर मनोहर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 07:59 PM2021-07-07T19:59:08+5:302021-07-07T19:59:27+5:30
Nagpur News प्रसिद्ध चित्रकार दिगांबर मनोहर यांचे बुधवारी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. प्रसिद्ध शेफ व विष्णू की रसोईचे संचालक विष्णू मनोहर तसेच प्रफुल्ल व प्रवीण मनोहर यांचे ते वडील होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्रसिद्ध चित्रकार दिगांबर मनोहर यांचे बुधवारी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. प्रसिद्ध शेफ व विष्णू की रसोईचे संचालक विष्णू मनोहर तसेच प्रफुल्ल व प्रवीण मनोहर यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात मुलगी सुचित्रा सहस्रभोजनी व मोठा आप्त परिवार आहे.
दिगांबर मनोहर यांचा जीवन परिचय
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्नेही असलेले दिगांबर मनोहर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होते. तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेत असलेल्या अध्यायासंदर्भात संत व महापुरुषांची रेखाचित्रे ही मनोहर यानी काढलेली आहेत. ग्रामगीतेतील चित्रांची संकल्पना तुकडोजी महाराज मनोहर यांना सांगत असत. त्यांच्या या अतुलनीय कार्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांचा सत्कार केला होता.